पुणे

चाकण बाजारात गाजराची तीस टन आवक

CD

चाकण, ता. १८ : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात (ता. १८) राजस्थानातून गाजराची सुमारे तीस टन आवक झाली. गाजराला घाऊक बाजारात प्रतिकिलोस २० रुपये बाजारभाव मिळाला. मध्यप्रदेशातून हिरव्या वाटाण्याची सुमारे चाळीस टन आवक झाली. त्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये बाजारभाव मिळाला. पालेभाज्यांचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
गुजरात राज्यातून तसेच नागपुरातून हिरव्या काळ्या व पिवळ्या मिरचीची मिळून सुमारे तीस टन आवक झाली. मध्यप्रदेशातील इंदोर बटाट्याला तसेच स्थानिक बटाट्याला प्रतिकिलोला अगदी १३ रुपये बाजारभाव मिळाला. आग्रा व गुजरात राज्यातूनही बटाट्याची आवक झाली. कांद्याची सुमारे सात हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिकिलोला सात ते सतरा रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी दिली.
गवार, हिरवा वाटाणा, राजमा वालाच्या शेंगा, हिरवी मिरची, वालवर, वांगी, भेंडी आदींचे बाजारभाव किरकोळ बाजारात प्रतिकिलोला वाढले आहेत. शेवग्याच्या शेंगांना १५० ते २०० रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला.
बाजाराच्या आवारात गुजरातहून तसेच नागपूर जिल्ह्यातून हिरव्या काळी मिरचीची, पिवळ्या मिरचीची सुमारे ३० टन आवक झाली. नाशिक, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे तीस टन आवक झाली. टोमॅटोला बाजारभाव २५ रुपये प्रतिकिलोला बाजारात मिळाला. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात भाव प्रतिकिलोला ६० ते ८० रुपये मिळाला. कांद्याची सुमारे सात हजार क्विंटल आवक झाली.


फळभाज्यांचे बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो) : टोमॅटो : २०, कारली : ३५-५०, दोडका : ३०-४५,भेंडी : ६०, गवार : १००, कोबी : १०, फ्लॉवर : २०, वांगी : ३०-४०, हिरवी मिरची : ६०-८०, दुधी भोपळा : २५, शेवगा : १५०-२००, ढोबळी मिरची : ६०, चवळी : ३०, हिरवा वाटाणा : २५-३०, काकडी : २५.


पालेभाज्यांचे बाजारभाव घसरले
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकच्या सुमारे दोन लाख वर जुड्यांची आवक झाली. मेथीच्या एका जुडीला ५ ते १० रुपये बाजारभाव मिळाला. कोथिंबीरीच्या एका जुडीला चार ते पाच रुपये भाव मिळाला. शेपूच्या एका जुडीला पाच रुपये बाजारभाव मिळाला. पालकच्या एका जुडीला पाच रुपये बाजारभाव मिळाला.


10021

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT