पुणे

गवार, मिरची, भेंडीच्या बाजारभावात वाढ

CD

चाकण, ता. ८ : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (ता. खेड) महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. ८) नागपूरहून हिरव्या मिरच्यांची सुमारे वीस टन आवक झाली. या मिरचीला प्रतिकिलोस ३० रुपयांनी वाढले. राजस्थानातून गाजराची सुमारे २० टन आवक झाली. गवार, हिरवा वाटाणा, राजमा वालाच्या शेंगा, मिरची, वालवर, वांगी, भेंडी यांचे बाजारभाव किरकोळ बाजारात प्रतिकिलोला वाढले आहेत.

चाकण बाजारात गाजराला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २५ रुपये बाजारभाव मिळाला. मध्यप्रदेशातून हिरव्या वाटाण्याची सुमारे २० टन आवक झाली. वाटाण्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये बाजारभाव मिळाला. गुजरात तसेच नागपुरातून हिरव्या काळ्या व पिवळ्या मिरचीची सुमारे २० टन आवक झाली. मध्यप्रदेशातील इंदोरी बटाट्याला तसेच स्थानिक नव्या बटाट्याला प्रतिकिलोला १४ रुपये बाजारभाव मिळाला. आग्रा व गुजरात राज्यातूनही साठवणूक केलेल्या बटाट्याची आवक झाली. कांद्याची सुमारे चार हजार क्विंटल आवक झाली. कांद्यास प्रतिकिलोला आठ ते १६ रुपये बाजारभाव मिळाला.

गुजरात तसेच नागपूरहून हिरवी-काळी तसेच पिवळ्या मिरचीची सुमारे २० टन आवक झाली. नाशिक, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे तीस टन आवक झाली. टोमॅटोला बाजारभाव १५ ते २० रुपये प्रतिकिलोला घाऊक बाजारात मिळाला. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रतिकिलोला ९० रुपये बाजारभाव मिळाला. बटाट्याला बाजारात प्रतिकिलोला चौदा रुपये भाव मिळाला.

फळभाज्यांचे भाव पुढील प्रमाणे (प्रतिकिलो) : टोमॅटो : १५-२०, कारली : २५-५०, दोडका :४०-५०, भेंडी : २५-३५, गवार : १००, कोबी : १२, फ्लॉवर : १५, वांगी : ३०, हिरवी मिरची :९०, दुधी भोपळा : ३०, शेवगा : १२०, ढोबळी मिरची: ६०, चवळी : ३०, हिरवा वाटाणा : २५-३०, काकडी : ३५, गाजर : २०, आले : ६०, वालवर : ५०.


दोन लाखावर जुड्यांची आवक
चाकण बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकच्या सुमारे दोन लाखावर जुड्यांची आवक झाली. मेथीच्या व कोथिंबिरीच्या एका जुडीला १० रुपये बाजारभाव मिळाला. शेपूच्या एका जुडीला १० रुपये बाजारभाव मिळाला. पालकच्या एका जुडीला १० रुपये बाजारभाव मिळाला.

10145

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ‘लाडक्या बहिणीं’वर खैरात, मात्र ‘लाडक्या भावां’च्या ताटात खडखडाट! निर्वाह भत्ता मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कसा झालेला विनोद खन्ना यांचा मृत्यू? दुसऱ्या पत्नीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं; म्हणाल्या, 'शेवटच्या दिवसात तर...'

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: विजयानंतर महाराष्ट्र भाजप प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले

Satara ZP Election Results : साताऱ्यात किंगमेकरच्या भूमिकेत 'धनुष्यबाण'; सत्तेच्या चाव्या 'शिंदे' सेनेकडे? भाजप सर्वात मोठा पक्ष, पण बहुमताचा पेच कायम

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली; नवीन तारीख काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT