पुणे

लाल मिरचीच्या ठसक्याचा ग्राहकांना झटका

CD

चाकण, ता.१२ : राज्यासह जिल्ह्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या  बाजारभावात सरासरी तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मिरचीच्या ठसक्याचा सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसला आहे. गृहिणींचे घरखर्चाचे बजेट बिघडले आहे. यंदा मोठा पाऊस झाल्याने ब्याडगी तसेच इतर मिरचीच्या पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट झाली आहे. परिणामी आवक रोडवल्याने बाजारभावाचा आलेख वाढत चालला आहेत.

मिरचीच्या बाजारभावात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर ग्राहकांनी मात्र लाल मिरचीचा ठसका बसला आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मात्र झटका बसत आहे असे वास्तव आहे. यावर्षी राज्यात झालेला मोठा पाऊस त्यामुळे मिरचीच्या पिकांचे नुकसान झाले. मिरचीच्या झाडांना ज्या मिरच्या लागल्या त्यांची पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळ झाली. मिरच्यांची पिके शेतातील पाणी साचल्याने सडून गेली. त्यामुळे राज्यात व परराज्यात मिरचीचे पीक कमी प्रमाणात राहिले. मोठ्या प्रमाणात पीक गेल्याने राज्यात आवक मंदावली आहे. त्यामुळे यंदा लाल मिरची ग्राहकांच्या जिभेला तिखटच वाटणार आहे. मागीलवर्षी मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात झाल्याने आवक वाढली होती. राज्यात ब्याडगी मिरचीचा बाजारभाव ३५० रुपयांच्या वर गेला नव्हता. सध्या सरासरी भावात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यामुळे घटले उत्पादन
-फुलोऱ्यातील मिरचीच्या झाडांना पावसाने झोडपले
- लागडलेल्या मिरच्याही गळून पडल्याने नुकसान
- वारंवार होणाऱ्या पावसामुळे पीक उद्‌ध्वस्त

जानेवारी ते मे दरम्यान मिरचीची खरेदी
राज्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, गुजरात या राज्यातून हिरव्या व लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होते. जानेवारी ते मे असा लाल मिरचीचा हंगाम असतो. त्या काळात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून तसेच मसाला, मिरची पावडर बनविणाऱ्या कंपन्यांकडून, ग्राहकांकडून मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी होते.

मिरचीचा कमाल बाजारभाव रुपयांत (प्रतिकिलो)
‘केडीएल’ कर्नाटकी ब्याडगी..........६००
संकेश्वरी जवारी..........१२००
तेजा.......... ३५०
गुंटूर..........३५०
सिजेंटा..........५००
गरुडा..........४००


जुन्या मिरचीचीही बाजारात विक्री
राज्यात तसेच परराज्यात पावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. बाजारभाव वाढल्याने व्यापारी, ग्राहकांनी, छोटे व्यावसायिक यांनी लाल मिरची खरेदी सध्या कमी प्रमाणात सुरू ठेवली आहे. यंदा आवक घटल्याने भावात मोठी वाढ झाली आहे.मात्र, मागील वर्षीच्या जुन्या मिरच्याही बाजारात विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

पावसामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात तसेच परराज्यात मिरचीचे उत्पादन घटले आहे. परराज्यातूनही आवक कमी आहे. गुजरात राज्यातील तसेच महाराष्ट्रातील आवक कमी आहे. यामुळे लाल मिरचीचे बाजारभाव सध्या वाढले आहेत.
- रवींद्र बोराटे, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : मुलुंड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

Pune Kolhapur Highway accident : पुणे -कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, पत्नी जागीच ठार तर पती गंभीर

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितलं; उस्मान तारीकबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT