पुणे

कांदा उत्पादकांचा राजमा पिकाकडे कल

CD

चाकण, ता. १४ : कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी राजमा पिकाचे उत्पादन घेऊ लागला आहे. सध्या किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो भावाने राजमा विकला जात आहे.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये राजमाचे उत्पादन वाढले आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर यासह जालना, बीड येथेही राजमा पीक घेतले जात आहे.या पिकाचा उत्पादन खर्चही कमी आहे. एका एकरासाठी साधारणपणे दहा ते बारा हजार रुपये खर्च येत आहे. शेतकऱ्याला राजमा पिकापासून एकरी एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळत आहे. राजमा पिकासाठी बियाणे, औषधे, खते, मजुरी असा खर्च येतो. एका एकरासाठी साधारणपणे दहा ते बारा, पंधरा हजार रुपये खर्च येत आहे.
राजमा पिकाला खर्च कमी, पिकाला पाणी कमी, औषधे कमी लागत असल्याने एकरी खर्च कमी येतो. एकरी उत्पादन १५ ते २० क्विंटलपर्यंत निघते. साधारणपणे एका महिन्यात राजमा चे पीक काढणीस येते.

राजम्यासह फरस बी, बीन्सला मागणी
चाकण येथील व्यापारी तसेच खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र गोरे यांनी सांगितले की, कांदा पिकाचे बाजारभाव दिवसेंदिवस घसरत आहेत. मुख्यतः राजमा पिकाला मागणी वाढत आहे. भावही व्यवस्थित मिळतो. यामुळे बहुतांश शेतकरी राजमा पिकाकडे वळत आहेत. त्यामुळे राज्यातून राजमाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. घाऊक बाजारात राजमा ६० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. राजमा बरोबर फरस बी, बीन्स यांचेही उत्पादन घेत आहे. त्यांनाही हॉटेल, चायनीज स्टॉलमधून मागणी राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुधारणेचे फायदे मिळणार? मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाचा अर्थ काय?

गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर माफी मागायला पनवेलच्या जंगलात पोहोचला; तिच्या आत्म्याला बोलावल्याचा दावा, तरुणाला अटक

Army Recruitment Update : नोकरीसाठी सुवर्णसंधी! माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सैन्य दलात भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

IRE vs ZIM सामन्यावर पावसाचं सावट; जर मॅच झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाचं काय होणार? धक्कादायक निकाल

नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईकांची एकाधिकारशाही, मंदा म्हात्रे समर्थकांना पुन्हा डावलल्याने भाजपातील अंतर्गत संघर्ष तीव्र

SCROLL FOR NEXT