पुणे

एसटी बसमध्ये महिला प्रवाशाची लूट

CD

चाकण, ता. १४ : शिवाजीनगर-नाशिक एसटी बसमधील महिला प्रवाशाचे पाच लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने तीन अनोळखी महिलांनी चोरून नेले. मोशी ते खेड दरम्यान ३० जानेवारीला ही घटना घडली असून, याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता मोहन जाधव (वय ५५, रा. कडूस, ता. खेड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, संगीता जाधव या पती, सून आणि नातीसह भोसरी येथून एसटीने गावी जात होत्या. मोशी येथे तीन महिला दोन लहान मुलांसह बसमध्ये चढल्या. त्यातील एका महिलेने संगीता यांच्याकडे लहान मूल दिले आणि त्यांना हातातील बॅग खाली ठेवण्यास सांगितले. दुसरी महिला गप्पा मारून संगीता यांचे लक्ष वेधत असताना, खाली बसलेल्या दोन महिलांनी बॅगेतील दागिने लंपास केले, असे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (ता. १३) ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : गोंदियात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Bavchi ZP Election : ‘क्रॉस वोटिंग’ राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय; समन्वयाचा अभाव नडला, शिवसेनेला ताकद नसताना बावची, गोटखिंडी गणात विजय

SCROLL FOR NEXT