पुणे

चाकण परिसरात अल्पवयीन गुन्हेगारीचा विळखा

CD

चाकण, ता. १७ : चाकण औद्योगिक पट्ट्यात अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत या मुलांकडून १२ खून झाल्याची माहिती समोर आली आहे. समाजमाध्यमांचे आकर्षण आणि पालकांच्या दुर्लक्षामुळे १४ ते १८ वयोगटातील मुले गंभीर गुन्ह्यांकडे वळत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
चाकण आणि महाळुंगे परिसरात शस्त्रांचा वापर, दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड आणि समाजमाध्यमांवरून धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत. किरकोळ वादातून टोळ्या तयार करून हल्ले करण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. औद्योगिक वसाहतीमुळे पालकांचे कामावर असणे आणि मुलांवरील देखरेखीचा अभाव ही यामागची मुख्य कारणे मानली जात आहेत. गुन्हेगारीचे वाढते आकर्षण आणि व्यसनाधीनतेमुळे ही मुले चुकीच्या मार्गाला लागत असल्याचे चित्र आहे.
कुटुंबातील संवादाचा अभाव, योग्य मार्गदर्शन न मिळणे ही देखील गंभीर कारणे आहेत. पोलिस प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. संशयित भागांत गस्त वाढवली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. पालकांनी मुलांच्या वर्तनातील बदलांकडे लक्ष द्यावे, त्यांच्या मित्रपरिवाराची माहिती ठेवावी वेळोवेळी समुपदेशन घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
"भपकेबाजपणा" महत्त्वाचा घटक
अल्पवयीन मुलांनी टोळ्या तयार केल्या आहेत प्रतिस्पर्धी गटांवर हल्ले करत आहेत. भ्रमणध्वनी व समाजमाध्यमांचा वाढता वापर, ''इन्स्टा रील्स'', चित्रफिती आणि स्टेटसच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. गुन्हेगारीचे "''भपकेबाजपणा''" हा या कलमागील महत्त्वाचा घटक आहे हे चित्र आहे.

अल्पवयीन मुलांनी गुन्हे केल्यानंतर त्यांना अटक करता येत नाही त्यांना ताब्यात घेऊन त्यांना बालसुधारगृहात पाठविले जाते. त्यांची सुटका लवकर होते त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले असले तरी त्यावर पोलिस नियंत्रण आणत आहेत. त्यांनी गुन्हे करू नये यासाठी त्यांना मार्गदर्शनही करत आहोत. पालकांनी सुद्धा आपली मुले काय करतात याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
- जितेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT