पुणे

होळीनिमित्त गोवऱ्यांच्या मागणीत वाढ

CD

चाकण, ता. १८ : अवघ्या काही दिवसांवर होळी सण आल्याने राज्यात सर्वत्र होळीच्या तयारीला वेग आला आहे. गोवऱ्यांना मागणी वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही गोवऱ्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. काही शेतकरी गावातून गोवऱ्या शहरात विक्रीसाठी नेतात.
होळी दहनासाठी लाकूड, शेणाच्या गोवऱ्या तसेच इतर पूजासाहित्य वापरले जाते. यंदा गोवऱ्यांचे दर वाढले आहेत. शेकडा गोवऱ्या पाचशे ते एक हजार रुपयाला मिळतात. एका गोवरीची किंमत पाच ते दहा रुपये आहे. वाढती मागणी, वाहतूक खर्च, जनावरांच्या चाऱ्याचा वाढता खर्च, गोवऱ्या थापण्याचा खर्च यामुळे किमतीत वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील शेतकरी महिलांसाठी शेणाच्या गोवऱ्या थापून त्या वाळवून विकणे हा शेतीला पूरक जोड धंदा ठरत आहे. काही ठिकाणी ऑनलाइन ऑर्डरची सुविधाही काही व्यवसायिकांकडून, गोठे मालकांकडून उपलब्ध करण्यात येते.
पर्यावरणपूरक सण साजरा करण्याच्या दृष्टीने शेणाच्या गोवऱ्यांचा वापर अधिक योग्य मानला जातो. लाकडाच्या तुलनेत गोवऱ्यांमुळे कमी प्रमाणात झाडांची तोड होते. प्रदूषणही तुलनेने कमी होते असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. त्यामुळे शेणाच्या गोवऱ्यांचा वापर दिवसेंदिवस वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway Recruitment 2026: ना परीक्षा, ना मुलाखत! १०वी उत्तीर्णांसाठी पश्चिम रेल्वेत 'या' पदांसाठी निघाली मेगा भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

निक जोनसने तर हातात घातलं पण 'हा' मराठी अभिनेता चक्क गळ्यात घालून फिरतोय बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, कोण आहे तो?

Latest Marathi News Live Update : दहावीच्या परीक्षेदरम्यान शिक्षकांमध्ये राडा

Prajakta Gaikwad : येसूबाईंनी पतीसोबत घेतलं कुलदैवताचं दर्शन! लग्नानंतर थेट येडेश्वरी देवीच्या चरणी; पाहा प्राजक्ता गायकवाडचा खास अंदाज, देवीकडं मागितलं 'हे' मागणं

Online Maid Hire: घरकाम होणार आता झटपट पटापट... घरकामासाठी मोलकरीण ऑनलाईन बुक करता येणार; प्रक्रिया आणि दर काय? वाचा...

SCROLL FOR NEXT