चाकण, ता. २१: मेदनकरवाडी (ता.खेड) येथे शनिवारी (ता.२१) पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने मेंढरावर हल्ला केला. या हल्ल्यात एक मेंढरू गंभीर जखमी झाले आहे. मेंढराच्या मानेवर बिबट्याचे खोलवर दात लागलेले आहेत.
मेंढरावर पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार केले आहेत. मेंढपाळ व त्याचे कुटुंब जोरात ओरडल्याने बिबट्याने जबड्यात धरलेल्या मेंढ्याला सोडून धूम ठोकली. या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
संबंधित मेंढरू मेंढपाळ राजू ठोंबरे यांचे होते. मेंढपाळ ठोंबरे यांचा मेंढराचा वाडा शेतकरी नंदाराम भुजबळ यांच्या शेतात बसलेला आहे. बिबट्याने पहाटे सुमारे साडेतीनच्या सुमारास अचानक मेंढ्याच्या वाड्यावर मेंढ्याच्या भोवती बांधलेल्या जाळीवर हल्ला केला व आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. जाळीतून त्याने एका मेंढराची मान पकडली. या हल्ल्यामुळे इतर मेंढरे ओरडल्याने मेंढपाळ ठोंबरे व त्याचे कुटुंब जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला. दरम्यान, ही माहिती चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कंक यांना सांगितल. त्यानंतर त्यांनी तेथे पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.