पुणे

चाकणला पन्नास टन बटाट्याची आवक

CD

चाकण, ता.२२ : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. २२) ५० टन मध्यप्रदेशातून बटाट्याची आवक झाली. स्थानिक नव्याने काढणी केलेल्या ३० टन बटाट्याची आवक झाली. नागपूरहून हिरव्या मिरच्यांची सुमारे ३० टन आवक झाली.

बाजारात राजस्थानातून गाजराची सुमारे वीस टन आवक झाली. गाजराला घाऊक बाजारात प्रतिकिलोला पंचवीस रुपये भाव मिळाला. मध्यप्रदेशातून हिरव्या वाटाण्याची सुमारे वीस टन आवक झाली. हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला पंचवीस ते तीस रुपये बाजारभाव मिळाला. गुजरात राज्यातून तसेच नागपुरातून हिरव्या काळ्या व पिवळ्या मिरचीची मिळून सुमारे तीस टन आवक झाली. मध्यप्रदेशातील इंदोर बटाट्याला तसेच स्थानिक नव्या बटाट्याला प्रति किलोला अगदी तेरा, चौदा रुपये भाव मिळाला.
कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. गवार, हिरवा वाटाणा, राजमा वालाच्या शेंगा, हिरवी मिरची, वालवर, वांगी, भेंडी यांचे बाजारभाव किरकोळ बाजारात प्रतिकिलोला वाढले आहेत.

नाशिक, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे तीस टन आवक झाली. टोमॅटोला ३० ते ४० रुपये प्रतिकिलोला घाऊक बाजारात मिळाला. बटाट्याला बाजारात प्रति किलोला चौदा रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याची सुमारे नऊ हजार क्विंटल आवक झाली. दरम्यान, जुन्या कांद्याची आवक अजिबात होत नाही.
फळभाज्यांचे बाजारभाव पुढील प्रमाणे (प्रति किलोचे भाव) : टोमॅटो : ३०-४०, कारली : ३०-३५, दोडका : ४०-५०, भेंडी :३०-३५, गवार : १००, कोबी : १२, फ्लॉवर : १५, वांगी : ३०, हिरवी मिरची : १००, दुधी भोपळा : ३०, शेवगा : १२०, ढोबळी मिरची : ३५, चवळी : ३०, हिरवा वाटाणा : २५-३०.

दोन लाखावर जुड्यांची आवक
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक च्या सुमारे दोन लाखावर जुड्यांची आवक झाली. मेथीच्या व कोथिंबिरीच्या एका जुडीला १० रुपये बाजारभाव मिळाला. शेपू, पालकच्या एका जुडीला १० रुपये बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali: ''आपण हास्यजत्रेच्या निवेदिका आहात, परंतु...'', मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या प्राजक्ता माळीला ठाकरे गटाचा टोमणा

Success Story: हवेली तालुक्यातील हर्षद शिंदेंचे एव्हिएशन क्षेत्रात यश; अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश, देशातील केवळ ११ यशस्वी उमेदवारांमध्ये निवड!

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख नारायणगाव केसरीचा मानकरी, विजेत्या पैलवानांना 15 लाखाचा इनाम, भारत केसरी निरु गुज्जरवर एकेरी पट!

Summer Roof Cooling Tips: बाहेर कमी घरातच उन्हाचे चटके बसतायत? मग छताची उष्णता कमी करण्यासाठी फॉलो करा 'हे' स्मार्ट जुगाड

New Scam : मोबाईल वापरताना छोटीशी चूक! अकाऊंट मधले पैसे हळूहळू होतील गायब; पटकन बदलून घ्या एक सेटिंग अन् डायल करा 'हा' नंबर

SCROLL FOR NEXT