पुणे

युद्धाच्या भडक्याची कांदा निर्यातीस झळ

CD

चाकण, ता. ३ : अमेरिका, इस्राईल, इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यामुळे दुबई व इतर आखाती देशांनाही युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसलेला आहे. मुंबई येथील जवाहरलाल नेहरू (जेएनपीटी) बंदरावर महाराष्ट्रातील १५० हून अधिक कंटेनरमध्ये भरलेला  कांदा  निर्याती अभावी अडकून पडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी, निर्यातदार कंपन्या यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

दुबई येथे कांदा निर्यात कधी सुरू होणार? तेथील बाजारपेठ कधी खुली होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकरी तसेच निर्यातदार कंपन्या अस्वस्थ आहेत.  कांदा  प्रामुख्याने  दुबईमार्गे  आखाती प्रदेशांत निर्यात केला जातो. सध्याच्या  युद्धजन्य  परिस्थितीमुळे दुबईचे मार्केट तीन दिवसांपासून ठप्प आहे. दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने हजारो टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडला आहे.


कांद्याचे कमी झालेले भाव, कांदा उत्पादन खर्चात झालेली वाढ, निर्यात धोरणात सातत्याने होणारे बदल व सध्या युद्धामुळे पूर्णपणे ठप्प झालेली निर्यात यामुळे शेतकरी तसेच व्यापारी, निर्यातदार कंपन्या यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारावर जादा ताण येऊन तसेच मोठी आवक होऊन पुन्हा भाव कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंटेनरमध्ये कांदा अनेक दिवस पडून राहिल्यास माल खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बाजारभाव होणार कमी
देशांतर्गत कांदा अधिक प्रमाणात विकावा लागला तर कांद्याचे बाजारभाव कमी होईल व प्रतिकिलो दहा रुपयांपेक्षाही कमी भाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल, असे कांदा निर्यातदार, व्यापारी प्रशांत गोरे पाटील, व्यापारी माणिक गोरे, जमीरभाई काझी, राम गोरे यांनी सांगितले.


युद्धजन्य परिस्थितीत कांद्याची निर्यात ठप्प झाली तर शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये तात्काळ अनुदान जाहीर करावे. निर्यात सुरू होईपर्यंत केंद्र सरकारने तात्पुरती खरेदी योजना जाहीर करावी. केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- गजानन गांडेकर, शेतकरी बचाव आंदोलन संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

लोकांच्या घरात आश्रय ते गळक्या घरात संसाराची सुरुवात; शेर शिवराज फेम अभिनेत्याने उलगडला स्ट्रगलचा काळ

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

War Impact on Grape : युद्धाचा द्राक्ष दरावर परिणाम नाही; जिल्ह्यात ३० टक्के शिल्लक, उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ, रमजानचाही परिणाम

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT