पुणे

गॅससाठी चाकण येथे पहाटेपासून रांगा

CD

चाकण, ता. ११: चाकण परिसरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांच्या लांब रांगा लागत आहेत. गॅस वितरकांसमोर पहाटेपासून १०-१० तास उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने कामगार आणि महिलांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
औद्योगिक पट्टा असलेल्या चाकणमध्ये लाखो कामगार वास्तव्यास आहेत. मध्यपूर्वेतील युद्धस्थिती आणि पुरवठ्यातील ताणामुळे केंद्र सरकारने ''''एस्मा'' (ESMA)'' कायदा लागू केला असला, तरी स्थानिक पातळीवर वितरण व्यवस्था कोलमडली आहे. राजू यादव, नाना गायकवाड या कामगारांनी सांगितले की, कामावर जाण्याऐवजी गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने रोजंदारी बुडत आहे. दुसरीकडे, गॅस फिलिंग प्लांटमधून पुरवठा कमी झाल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. तर वितरक कर्मचाऱ्यांच्या मते, गॅस संपण्याच्या भीतीने नागरिक आगाऊ साठवणूक करण्यासाठी गर्दी करत आहेत. बुकिंग नसतानाही अनेकजण रांगेत उभे राहत असल्याने गोंधळ वाढत आहे. मात्र, गॅस सिलिंडरसाठी बुकिंग होत नाही. तसेच ग्राहकांनी घरपोच गॅस मिळत नसल्याने रांगेत उभे राहावे लागत आहे."

घरगुती वापराच्या एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गॅस घरपोच दिला जातो.
प्रशांत बेडसे-पाटील, तहसीलदार, खेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT