पुणे

काळ्या ऑईलवर चालणाऱ्या शेगड्यांकडे कल

CD

चाकण, ता. १५: गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि विस्कळित पुरवठ्यामुळे चाकणमधील हॉटेलव्यावसायिकांनी आता काळ्या ऑईलवर चालणाऱ्या शेगड्यांचा पर्याय स्वीकारला आहे. कमी खर्च आणि सुलभ उपलब्धतेमुळे हा बदल परवडणारा ठरत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
हॉटेल व्यवसायात दररोज मोठ्या प्रमाणावर इंधन लागते. कमर्शियल गॅसचे दर वाढल्याने छोट्या व मध्यम हॉटेलचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर उपाय म्हणून रामदास गायकवाड आणि सदाशिव गायकवाड यांसारख्या व्यावसायिकांनी ऑईल शेगड्यांकडे मोर्चा वळवला आहे. या शेगड्यांमध्ये वापरले जाणारे काळे ऑईल स्वस्त असून त्यातून मिळणाऱ्या अधिक उष्णतेमुळे अन्न शिजवणे सोपे जाते, असे स्वयंपाकी राजीव कलकते यांनी नमूद केले.
दरम्यान, या शेगड्यांच्या वापराबाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेचे नियम न पाळल्यास आगीचा धोका उद्भवू शकतो, त्यामुळे उपकरणांची योग्य देखभाल आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. या बदलाचा अन्नाच्या चवीवर परिणाम होत नसला तरी स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
१० हजारांत गॅसमुक्त स्वयंपाक
काळ्या ऑईलवर चालणाऱ्या या शेगड्यांमध्ये विजेवर चालणाऱ्या पंख्याचा वापर केला जातो. सुमारे दहा हजार रुपयांना मिळणाऱ्या या शेगडीत पाच लिटर ऑईल दिवसभर पुरते. यातून निघणाऱ्या मोठ्या जाळामुळे वडे, सांबर यांसारखे पदार्थ लवकर तयार होतात, अशी माहिती रामदास गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

‘मी खूप बदनाम आहे, माझा भूतकाळ सडलेला आहे’ असं का म्हणालेल्या रेखा?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT