पुणे

जलस्रोत आटल्यामुळे प्रशासनाची दमछाक

CD

चाकण, ता. १८ (बातमीदार) : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना दररोज सुमारे शंभर खासगी टँकरद्वारे लाखो रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. विहिरी, बोअरवेलची भूजल पातळी खालावल्याने स्थानिक जलस्रोत कोरडे पडले असल्याने ६० ते ७० हजार लोकसंख्येची तहान भागवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. शासनाने त्वरित टॅंकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नाणेकरवाडी परिसरात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने येथे कामगार आणि भाडेकरूंची संख्या मोठी आहे. ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर महिनाभरापासून कोरडी असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) आठवड्यातून केवळ दोनदाच पाणी मिळते, जे अपुरे पडत आहे. परिणामी, नागरिकांना एका टँकरसाठी तीन ते पाच हजार रुपये मोजावे लागत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक जेरीस आले आहेत.

एका टॅंकरसाठी ...... ५ हजार रुपये
गावची लोकसंख्या ......५० हजार
खासगी टँकर...... १०० दररोज

प्रशासक नियुक्तीच्या प्रतीक्षेतग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अद्याप नियुक्ती झालेली नाही. ''एमजेपी''कडून अधिक पाणी मिळावे, यासाठी खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत लवकरच स्वतःहून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

गावाची सार्वजनिक विहीर कोरडी पडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. एमजेपीचे पाणीही कमी प्रमाणात मिळते. ग्रामपंचायतीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे.
- छाया इरणक, ग्रामविकास अधिकारी, नाणेकरवाडी.


औद्योगिक पट्ट्यातील या गावाची लोकसंख्या ५० हजारांवर आहे. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
- राम जाधव, ग्रामस्थ

यामुळे समस्या बनली गंभीर
- भूजल पातळी लक्षणीयरीत्या खालावली
- रहिवाशांवर,भाडेकरूंची भागेना तहान
- काही सार्वजनिक नळाचे पाणी गायब
- खासगी टँकरवर नागरिकांची भिस्त
- पाणीपुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय गरजेचे
- पाणीटंचाई ही गंभीर समस्या बनली आहे.

पाण्यासाठी नागरिक आर्थिक मेटाकुटीला
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणी आठवड्यातून दोनदा
- मोठी लोकसंख्या असूनही दोन लाख लिटरच पाणी
- भाडेकरूना दररोज पाणी विकत घ्यावे लागते.
- एका टँकरची किंमत तीन ते पाच हजार रुपये
- नागरिकांचा पाण्यावर लाखो रुपयांचा खर्च

नाणेकरवाडी (ता. खेड) : सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेची कोरडी पडलेली विहीर.


10347कोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT