पुणे

आता आम्ही जगायचे कसे?

CD

चाकण, ता. २० : राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार तरुणींचे हाल होत आहेत. घरगुती गॅस ४०० रुपये प्रति किलो दराने काळ्या बाजारात खरेदी करावा लागत असल्याने, ''आम्ही जगायचं कसं?'' असा संतप्त सवाल या तरुणींनी उपस्थित केला आहे.
चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीत नांदेडसह परराज्यातील अनेक तरुण-तरुणी भाड्याने राहून कंपन्यांमध्ये काम करतात. सध्या प्रशासनाकडून गॅस उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात कामगारांना गॅस मिळणे कठीण झाले आहे. बहुतांश कामगार छोट्या हंडीचा वापर करतात. मात्र, या हंडीत गॅस भरण्यासाठी ४०० रुपये किलोप्रमाणे दर आकारले जात आहेत. दोन किलो गॅससाठी ८००, तर चार किलोसाठी १६०० रुपये मोजावे लागत असल्याने कामगारांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

काळाबाजार सुरू
आम्ही महिंद्रा कंपनीत काम करतो. पगारातील मोठा हिस्सा भाडे आणि गॅसवरच खर्च होत असेल, तर उदरनिर्वाह कसा करायचा? शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी कोमल सोनवणे, अंजली शर्मा व निकिता सादलवार या तरुणींनी केली आहे. दरम्यान, मेदनकरवाडी व चाकण परिसरात गॅसचा मोठा काळाबाजार सुरू असून प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा प्रवास सोपा नव्हता; वडिलांनी सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Pune: वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त; पिंपरे परिसरात पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गाव बंद

SCROLL FOR NEXT