पुणे

बेकायदा गॅस भरणाऱ्या तिघांना भोसे येथे अटक

CD

चाकण, ता. ३१ : भोसे (ता. खेड) येथे चाकण- शिक्रापूर रस्त्यावर इंडियन ऑइल कंपनीच्या पार्किंगमध्ये गॅस टँकर कॅप्सूलच्या आउटलेट पाईपला नोझलच्या साह्याने घरगुती गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ४९ लाख ५७ हजार सहाशे रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली.
याबाबत चाकण उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी माहिती दिली की, हा प्रकार मंगळवारी (ता. ३१) पहाटे साडेचारच्या सुमारास सुरू होता. याप्रकरणी अंबादास रोहिदास गाडे (वय ४२, रा. चेंबूर, मुंबई, मूळ रा. आझादनगर, बरकतनगर, परळी वैजनाथ, जि. बीड), अक्षय रमेश मुंगसे (वय २५, रा. रासे, ता. खेड), नवनाथ अंकुश होजगे (वय ३४, रा. होजगे वस्ती, भोसे) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४९ लाख ५७ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT