चाकण, ता. ५ : चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील माणिक चौकात थेट डांबरीकरणावर भरवल्या जाणाऱ्या अनधिकृत बाजारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होऊन पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.
येथील माणिक चौकाचे रुंदीकरण केल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेवर आणि सांडपाणी वाहिनीच्या ओट्यांवर विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. विशेषतः गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी कामगार व नागरिकांच्या गर्दीमुळे परिस्थिती गंभीर होते. रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने वाहतुकीसाठी जागा उरत नाही, परिणामी दुचाकी आणि पादचाऱ्यांमध्ये किरकोळ धडकांचे प्रमाण वाढले आहे.
रुंद केलेल्या मार्गाचा वापर पार्किंग आणि बाजारासाठी होत असल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. भविष्यातील मोठा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने विक्रेत्यांची स्वतंत्र व्यवस्था करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत.
10443
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.