पुणे

चाकणमध्ये बनावट नोटा देऊन मोटार खरेदी करण्याचा प्रयत्न

CD

चाकण, ता. ६ : बनावट नोटा देऊन मोटार विकत घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपींवर चाकण उत्तर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल ४२ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
याबाबत चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी माहिती दिली की, फिर्यादी हुजेब फिरोज बागवान (वय २६, रा. बारामती) हे त्यांचे मित्र अरबाज आयुब शेख यांची मोटार विकण्यासाठी पुण्यात आले होते. आरोपी गणेश ज्ञानदेव ठाकरे (वय २१) याने मोबाईलवरून संपर्क साधून मोटार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार रविवारी (ता. ५) चाकण (ता. खेड) येथील माणिक चौक परिसरात त्यांचा व्यवहार ठरला. आरोपीने मोटारची किंमत साडेतीन लाख रुपये निश्चित केली. त्यापैकी तीन लाख रुपये रोख स्वरूपात प्लॅस्टिक रॅपरमध्ये गुंडाळलेले ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल फिर्यादीला दिले. तसेच, उर्वरित ५० हजार रुपये नाव ट्रान्स्फर झाल्यावर देण्याचे कबूल केले. पैसे दिल्यावर आरोपी मोटार घेऊन वेगाने निघून गेला. त्यानंतर फिर्यादीने बंडल उघडून पाहिले असता त्यामध्ये फक्त वरची आणि खालची नोट खरी होती, पण मधल्या सर्व नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने चाकण उत्तर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली. पोलिस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, तसेच गुप्त बातमीदारांमार्फत तपास करून काही तासांतच आरोपींचा शोध घेतला. आरोपी गणेश ठाकरे व समीर दिनकर महल्ले यांच्या ताब्यातून गुन्ह्यात फसवणूक करून खरेदी केलेली मोटार आणि ४२ लाख ५० हजार रुपयांच्या भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, नोटाचे बंडल पॅक करण्याचे साहित्य आदी जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Live: पंजाबच्या यष्टिरक्षकाने सहकाऱ्याला चेंडू फेकून मारला... मग काय, गडी पेटला अन् पुढच्या ३ चेंडूंत धिंगाणा घातला

‘भूत बंगला’ ट्रेलर प्रदर्शित: १४ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शनचा धमाका, थरार आणि विनोदाचा अनोखा संगम!

'या' अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी माता करणार या 4 राशींकडे गृहप्रवेश ! संपत्ती आणि सुखाची भरभराट

Ambajogai News : स्वारातीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याने संपविले जीवन; कारण अस्पष्ट

IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

SCROLL FOR NEXT