चाकण, ता. १५ : मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
देशांतर्गत बाजारात आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले आहेत. यामुळे चाकण परिसरातील शेतकरी संकटात सापडले असून उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. तसेच चाकण बाजार समितीतील व्यापारीही हवालदिल झाले आहेत.
चाकण बाजार समितीत कांद्याची १२ हजार क्विंटल आवक झाली असून, घाऊक बाजारात प्रति किलो ८ ते १३ रुपये असा नीचांकी बाजारभाव मिळत आहे. बियाणे, खते आणि मजुरीचा खर्चही निघत नसल्याने गजानन गांडेकर, सुभाष पवळे या शेतकऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. साठवणुकीच्या सोयींअभावी कांदा सडण्याची भीतीही निर्माण झाली आहे. सध्या निर्यातीअभावी साठवलेला कांदा आता कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.
आखाती देशांत होणारी निर्यात थांबल्याचा थेट फटका बसत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सरकारने तातडीने हमीभाव, अनुदान आणि निर्यात धोरणात सुसूत्रता आणून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
कांदा आवक: १२ हजार क्विंटल
घाऊक भाव: किमान ८ ते कमाल १३ रु. प्रति किलो
आखाती देशात कांदा १७५ रुपये किलो
दुबई आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात ठप्प झाला आहे. त्यामुळे तेथे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतीय चलनानुसार तेथील बाजारपेठांत कांद्यास १७५ रुपये प्रतिकिलोला भाव सध्या आहे, असे व्यापारी जमीरभाई काझी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.