पुणे

कामाच्या बिलाचे पैसे मागितल्याने काळूस येथील तरुणाला मारहाण

CD

चाकण, ता. २७ : बिलाचे पैसे मागितल्याने काळूस (ता. खेड) येथील अक्षय किसन डुंबरे (वय २२) यास आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी तसेच हॉकीस्टिकने मारहाण केली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल. ग्रामपंचायतीच्या जवळील रस्त्यावर ही घटना रविवारी (ता.२७) घडली.
मारहाणप्रकरणी अक्षय डुंबरे याने फिर्याद दिली. दरम्यान, भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या एकाला मारहाण केली. आरोपी पळून जात असताना फिर्यादीचे वडील किसन डुंबरे यांनी त्यांची मोटार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस किसन यांना मोटारीच्या बॉनेटवर घेऊन साधारणपणे १०० फूट ओढत नेले. यामुळे ते जखमी झाले, अशी माहिती चाकण उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.
याप्रकरणी आरोपी अमोल आवटे, अजय बवले, निखिल खैरे, सत्यवान म्हसाडे, मारुती गव्हाणे व त्यांचे दोन ते तीन मित्र अशा आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सत्यवान म्हसाडे याच्याकडे अक्षयने कामाच्या बिलाचे पैसे मागितले होते. त्यामुळे आरोपींनी त्यास मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या शेखर पोटवडे यालाही आरोपींनी हॉकी स्टिकने मारहाण केली. दरम्यान, या मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना धक्का! लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट्स, तर गतविजेत्यांचा स्टार फलंदाजाची माघार

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; राजकीय वर्तुळात खळबळ; जिल्हा उपनिबंधक पाहणार कारभार

पोलिसांचा मोठा निर्णय! आरोपींना फुल कपड्यांवर बंदी, ड्रेस कोड लागू... कोठडी सुरक्षेसाठी नवे नियम

IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

विनोद खन्ना बॉलिवूड सोडून ओशोंकडे का गेले? दुसऱ्या पत्नीने सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'त्यांच्या जवळच्या व्यक्ती...'

SCROLL FOR NEXT