चाकण, ता. २८ : चाकणची राक्षेवाडी (ता. खेड) परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, बिबट्या जेरबंद झाल्याने
नागरिकांनी समाधान व्यक्त केले. येथील योगेश जाधव यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. मागील आठवड्यात आगरवाडी येथेही एक बिबट्या जेरबंद करण्यात आला. जेरबंद केलेल्या बिबट्याला पुढील उपचारासाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले आहे. परिसरात अजूनही इतर बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता असल्याने, वनविभागाने अधिक पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.