पुणे

चाकणमध्ये बालचमूंची किल्ले करण्याची लगबग

CD

चाकण, ता. १ : चाकण परिसरात लहान मुलांमध्ये किल्ले उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण देणाऱ्या या किल्ल्यांसाठी बाजारपेठेत मातीच्या चित्रांना आणि तयार किल्ल्यांना मागणी वाढली असून बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत.
दिवाळीत घरासमोर किंवा सोसायट्यांमध्ये मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा आजही कायम आहे. या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, घोडेस्वार, हत्ती आणि तोफांच्या प्रतिकृती मांडून त्यांना ऐतिहासिक स्वरूप दिले जाते. यंदा बाजारात विविध आकारांतील व रंगांतील मूर्ती उपलब्ध आहेत. मोबाईलच्या युगातही मुले स्वतः माती गोळा करणे, डोंगर बनवणे आणि सजावट करणे अशा कामांत उत्साहाने सहभागी होत आहेत. या उपक्रमातून मुलांना स्वराज्याचा इतिहास आणि गडकोटांची माहिती मिळत असल्याने पालकही त्यांना प्रोत्साहन देत आहेत. चाकणच्या बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याला मागणी असल्याने विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

काळ बदलला तरी मुलांचे किल्ल्यांविषयीचे आकर्षण कमी झालेले नाही. दीडशे रुपयांना एक डझन मातीची चित्रे मिळतात, तर मूर्तींचे भाव वेगळे असतात. यातून आम्हाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.
- संगीता शिर्के, मूर्ती विक्रेत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : बिहारमध्ये आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच दोन अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; विधान परिषदेत विरोधकांना मोठा धक्का

Pargav Water Crisis News : आंबेगावच्या पूर्वभागात घोडनदीकाठी गंभीर जलसंकट; डिंभे धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडे तीव्र मागणी

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

SCROLL FOR NEXT