चास, ता.३ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील भिवेगांव येथील शेतकरी विठ्ठल व अर्चना वनघरे हे संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॅाबेरीच्या शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहे. त्यांनी महिन्यात केवळ चार गुंठे क्षेत्रातून पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. अजून तीन महिने या पिकापासून उत्पन्न मिळणार आहे असल्याने सरासरी साठ ते सत्तर हजाराचे उत्पन्न अपेक्षीत आहे.
आयसीआयसीआय फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना स्ट्रॅाबेरीची लागवड करण्याबाबत आवाहन केले होते. त्यास भिवेगाव येथील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे फाउंडेशनच्या वतीने त्यांना रोपे पुरवण्यात आली. सेंद्रिय पद्धतीने करण्यात आलेल्या या लागवडीबाबत अर्चना वनघरे यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून आम्ही स्ट्रॅाबेरीची लागवड करत आहे. यासाठी आम्हाला आयसीआयसीआय फाउडेशनतर्फे रोपे मिळाली आहेत. जमिनीची मशागत करून शेणखत टाकून बेड तयार केल्यावर त्यावर ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. मल्चिंग पेपरच्या साह्याने बेडवर आच्छादन केल्यावर रोपांची लागवड केल्यावर पंधरा दिवसातच रोपांना फुले आली. लागवडीनंतर महिनाभराने फुलांमधून फळधारणा झाली व येथून पुढे तीन ते चार महिने स्ट्रॅाबेरी पिकापासून उत्पन्न मिळणार आहे. वातावरण चांगले असून, पिकाला कोणताही औषध वा खतांचा खर्च नसल्याने अतिरिक्त खर्च आलेला नसून, सरासरी साठ ते सत्तर हजाराचे उत्पन्न अपेक्षीत आहे. स्ट्रॉबेरीच्या काढणीनंतर विक्रीसाठी राजगुरुनगर किंवा वाडा येथे जावे लागत आहे. यामुळे वाहतुकीचा सरासरी खर्च वाढतो. मात्र जास्त फळे असल्यावर वाहतूक खर्च कमी होऊ शकत असल्याने पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॅाबेरीची लागवड करणार असल्याचे विठ्ठल वनघरे यांनी सांगितले.
01963
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.