पुणे

बिबी, वाडा येथे महाशिवरात्रीचा उत्सव

CD

चास, ता. १० : खेड तालुक्याच्या पश्चिमपट्ट्यातील बिबी व वाडा येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला, यानिमित्त शिवमंदिरात नागरिकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. बिबी येथील डोंगरावर वसलेले शंभो महादेवाचे मंदिर, वाडा येथील भीमाशंकराच्या मंदिरात सुमारे वीस हजार भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
खेड तालुक्याच्या पश्चिमपट्ट्यात बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र डाकिन्या भीमाशंकरच्या प्रभावामुळे तालुक्याच्या पश्चिम पट्यात प्रत्येक गावात शिवमंदिर असून या मंदिरात महाशिवरात्री साजरी केली जाते. शुक्रवारी बिबी येथील पुरातन अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोद्धार केलेल्या श्री शंभू महादेवाच्या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी शिवलिंगावर विधीवत पूजा, आरती झाल्यावर हारतुरे आणि सजावट करण्यात आली. सकाळी नऊ वाजल्यापासून शिवशंभो देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले. शिवशंभो प्रासादिक भजनी मंडळ बुरसेवाडी, राजे ग्रुप भजनी मंडळ कान्हेवाडी, कमलजादेवी भजनी मंडळ बुरसेवाडी यांचा भजनाच्या कार्यक्रम उत्साहात पार पडला. सायंकाळी संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज हभप रामदास महाराज मोरे यांची किर्तनसेवा पार पडली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री शंभो देवस्थान गुंडाळवाडी, बुरसेवाडी, ठाकरवाडी, बिबी डॅम ग्रामस्थांच्या वतीने केले होते. वाडा गावातील भीमाशंकराच्या मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, येथे उपसरपंच रोहिदास शेटे, शिवरामबुवा पावडे, तात्याभाऊ तनपुरे, कुशाबा तनपुरे, पांडुरंग हुंडारे, सुदाम घनवट, शिवाजी मोरे, देवराम शेटे यांनी उत्सवात मोलाची भूमिका पार पाडली. गणेश लांडगे यांच्या हस्ते शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला. सजावट भूषण शिंदे, रामा शिदे व रमेश हुंडारे यांनी केली होती. तर फराळवाटप राहुल थोरात, वैभव हुंडारे, यांच्या माध्यमातून करण्यात आले. गणेश प्रासादिक भजन मंडळ पाडळवाडी, गोहे यांची भजन सेवा पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT