पुणे

रानभाज्यांचा आहारात समावेश व्हावा : पारधी

CD

चास, ता.२७ : आरोग्यासाठी परिपूर्ण असणाऱ्या रानभाज्यांची माहिती सर्वसामान्य व शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना व्हावी व वर्षातून एकदा तरी या भाज्यांचा आपल्या आहारात समावेश व्हावा. या भावनेतून रानभाज्यांचा महोत्सव साजरा केला आहे, अशी माहिती जनजाती कल्याण आश्रम पुणे ग्रामीणचे अध्यक्ष संभाजी पारधी यांनी दिली.
भोमाळे (ता. खेड) येथे रविवारी (ता. २५) रानभाजी महोत्सवात पारधी बोलत होते. जनजाती कल्याण आश्रम पुणे ग्रामीण यांच्या माध्यमातून भीमाशंकर अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या भोमाळे येथे रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सुमारे बावीस प्रकारच्या भाज्या तयार करून ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये डांगर भोपळा, गोमठी, कर्टूली, चयताती भाजी, कोकम, कांडे चित्रूक, शेवाळी, बामणी आळींब, कडकिंद, रानकेळी, कसूर, कुरडू, गवती कावळी, काटेसवार, घोटवेल, चिचूर्डे, पाथरी, भारंगी, पाथवड या रानभाज्यांचा समावेश होता.

महोत्सवाचे उद्‌घाटनप्रसंगी अरुण काठे, विशाल भुरूक, विजय भालिंगे, विनायक खांडे, पुणे महानगर उपाध्यक्ष तुषारिका लिईमे, उपसरपंच अनिता सावंत, सतिष मोकाशी, मंगेश पारधी, कैलास भालेकर, केशव कडाळे, रेखाताई मराडे, शिवाजी मराडे, शंकर गोडे, दामू कावळे, अरुण काठे, रामदास भारमळ, शिवाजी चौरे, अशोक भवारी, लीलाताई मोडक, पुनाजी बुळे, उमेश ढमाले, स्वप्नील शिर्के यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात संतोषी माता महिला बचत गट, वसरसुबाई महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, दुर्गामाता महिला बचत गट, कळमजादेवी महिला बचत गट, श्री भैरवनाथ महिला बचत गट यांसह भोमाळे व परिसरातील ७० महिलांनी सहभागी होत रानभाज्या तयार करून आणल्या होत्या.
रामदास भारमळ यांनी सूत्रसंचालन तर शिवाजी चौरे यांनी आभार मानले.
02557

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT