पुणे

चास परिसरात बिबट्याची दहशत

CD

चास, ता. ४ ः चास (ता. खेड) येथे बिबट्याचा वावर वाढल्याने कुत्र्यांचा फडशा पाडला जात आहे. काही दिवसांपूर्वी शेळी, बोकड ठार केले. प्रत्यक्षदर्शींनी बिबट्यासोबत त्याचे दोन बछडेही असल्याचे पाहिल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याचा वावर सर्रास झाला आहे. चास येथे ब्राम्हण आळी परिसर, सरदार गल्ली, पेट्रोलपंप परिसर, सोमेश्र्वर मंदिर परिसरात बिबट्याचा सर्रास वावर वाढला. बिबट्याने राजेंद्र मुळूक यांच्या जनावरांच्या गोठ्यात प्रवेश करत एका बोकडाला ठार केले, अनेक भटकी कुत्री फस्त केली आहेत.

सोमवार (ता. ३) रोजी रात्री अकराच्या दरम्यान ब्राम्हण आळीमध्ये वास्तव्यास असलेले दीपक माने यांचा पूर्ण वाढ झालेला पाळीव जर्मन शेफर्ड कुत्रा बिबट्याने उचलून नेला. त्यावेळी त्या बिबट मादीसमवेत दोन बछडे असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात मातीवर बिबट्याच्या व बछड्यांच्या पावलांचे ठसे उमटलेले असून बिबट्याचा सर्वात जास्त वावर हा ब्राम्हणआळी व जवाहर विद्यालयाच्या मागील बाजूस आहे.

वनपाल एस. के. बिराजदार, वनरक्षक एस. एस. भागडे, अन्य वनविभागाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल, रात्रीची गस्त वाढवून भितीचे वातावरण कमी करू, नागरिकांनी एकट्याने फिरू नये, गटाने फिरण्यास प्राधान्य द्या, रात्री हातात काठी तसेच बॅटरीचा वापर करा, बिबट्याला डिवचण्याचा व दगड मारण्याचा प्रयत्न करू नका, वनविभागाशी संपर्क करा.
- वाय. यू. जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : हरिवंश यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड केली जाईल

SCROLL FOR NEXT