चास, ता.१८ : खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी डोंगराळ पट्यातील पाभे येथे भीमा नदीवर असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा परिसरातील नागरिकांसाठी सुखद दिलासा मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात बंधाऱ्यामध्ये टिकून राहत असलेल्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावांची शेती ओलीताखाली आली आहे.
बंधाऱ्यांतील पाण्यामुळे पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. आता सुजलाम् सुफलाम् प्रदेश म्हणून ओळख होऊ लागली आहे. यामुळे आदिवासी नागरिकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे.शेतकऱ्यांच्या घरी आर्थिक सुबत्ता आली आहे.
धरणांतर्गत पोटबंधारे ही संकल्पना प्रत्यक्षात नसताना एक ऐतिहासिक निर्णय घेत माजी आमदार दिलीप मोहिते यांनी नागरिकांची गरज ओळखली व व आदिवासी भागाला उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईला दिलासा देण्यासाठी चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाभे व डेहणे येथे पोटबंधारे उभारले. यामुळे परिसरातील नागरिकांचे उन्हाळ्यात होणाऱ्या पाण्याचे दुर्भिक्ष संपवले.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात पावसाळ्यात अतिवृष्टी तर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई अशा दुष्टचक्रात सापडलेला खेड तालुक्याच्या पश्चिम पट्टा. पावसाळ्यात केवळ भाताच्या पिकावर अवलंबून राहत रब्बी हंगामात हरभरा, हुलगा, मसूर व कडधान्यांची पिके घेणाऱ्या आणि ज्यांना पाण्याची शास्वती आहे. विहिरींच्या पाण्याची पातळी टिकली तरच गहू, ज्वारी अथवा फरशीची पिके घेणाऱ्या या भागाला उन्हाळ्यात पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. उन्हाळ्यात केवळ रानमेवा तसेच हिरडा गोळा करत त्याची विक्री करणाऱ्या व आपली उपजीविका करणाऱ्या पाभे परिसरातील नागरिकांना भीमा नदीवर असलेला बंधारा खऱ्या अर्थाने जीवनरेषा ठरत आहे.
पाभे येथील बंधाऱ्यामुळे शेतीमध्ये नवनवीन पर्याय उपलब्ध झाले असून या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यामुळे नागरिक गेली काही वर्षांपासून बारमाही पिके घेत आहेत. खरीप हंगामात भाताचे पीक तर रब्बी हंगामात कांदा, बटाटा, ज्वारी, फरशी तसेच अन्य पिकांबरोबर उन्हाळी हंगामात बाजरी, सिलेक्शन फरशी तर कमी कालावधीत येणारी धना, मेथी सारखी पिकेही शेतकरी घेत आहेत. सध्या स्थितीत बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा असून मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आता पाणींटंचाईच्या झळा बसणार नाहीत. धरणांतर्गत बुडीत बंधारे खरोशी, धुवोली, शिरगांव, मोरोशी या भागांमध्ये झाल्यास त्या भागातील पाणीटंचाई कायमची संपुष्टात येऊन ती गावेही सुजलाम् सुफलाम् होतील.
03172
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.