पुणे

बिबट्याचा कुत्र्यावर कमान येथे हल्ला

CD

चास, ता.२३ : कमान (ता. खेड) येथील लिंबगवळी वस्तीमध्ये पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला व त्यास पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील माणसांनी बाहेरचे दिवे लावून व आरडाओरडा करून कुत्र्यास बिबट्याच्या तावडीतून सोडविले.
कमान परिसरात बिबट्याचा वावर असून, गेली काही दिवसांपासून नागरिकांना त्याचे दर्शन होते आहे. पंधरा दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतात पिकांना पाणी देत असताना पहाटे विद्युत पंप बंद करून तो पुन्हा शेताकडे गेला. असता शेतामध्ये नेमका बिबट्या बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला. शेतकरी पती पत्नीने त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने जागा सोडली नाही. त्यामुळे पती पत्नीने आपल्या घरचा रस्ता धरला. वन विभागाने योग्य त्या उपाययोजना व जनजागृती करून या संदर्भात नागरिकांना सतर्क करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे मानवी वस्तीला होणारा धोका टाळावा, असे आवाहन लाईफ जागतिक पर्यावरण संस्थेचे समन्वयक व पर्यावरण प्रेमी शिक्षक संजय नाईकरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarnath World Heritage Status: ज्या भूमीवरून भगवान बुद्धांनी दिला पहिला उपदेश, त्या ऐतिहासिक सारनाथचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Sawantwadi Accident : कारची दुचाकीला धडक, २१ वर्षीय तरुणासह १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Update : ठाण्यातून शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रवाना

Premium|Chh. Shivaji Maharaj Agra Escape Plan : औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यातही शिवाजी महाराजांनी सुटकेची तयारी कशी केली?

Shri Vitthal Nirmal Dindi Puraskar 2026: कौंडण्यपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार’मध्ये प्रथम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

SCROLL FOR NEXT