चास, ता.२५, कमान (ता. खेड) येथील पाटीलवस्तीकडे जाणाऱ्या पुलाच्या भराव मुसळधार पावसात ओढ्याला आलेल्या पुरामुळे वाहून गेला. नागरिकांना या ओढ्याच्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. येणारा पावसाळा पाहता तातडीने या पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.
ओढ्याच्या पात्रात सिमेंटचे पाइप टाकून दोन्ही बाजूस तसेच पुलावरील सिमेंटच्या पाइपवर मुरमाचा भराव करण्यात आला होता. या पुलामुळे पाटीलवस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांची प्रामुख्याने पावसाळ्यात मोठी सोय झाली होती कारण मोठा वळसा घालून जाणारा त्यांचा वेळ वाचला होता. मात्र मंगळवारी (ता. १३) कमान व परिसरात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्याला पूर येऊन या पुरामध्ये पाटीलवस्तीकडे जाणाऱ्या साकव पुलावरील मुरमाचा भराव पूर्णपणे वाहून गेला व फक्त पाइप शिल्लक राहिले. यामुळे या वस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठा गैरसोय झाली आहे. पावसाळा नजीक येऊन ठेपल्याने तातडीने या पुलाच्या दुरुस्तीची मागणी महादेव नाईकरे, रामदास नाईकरे, कुमार नाईकरे, पोपट नाईकरे, जयशंकर नाईकरे यांसह अन्य नागरिकांनी केली आहे.
-----------------
03418
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.