पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात खेडोपाडी प्रसिद्ध असलेले दिलीपशेठ, आमदार दिलीपराव व त्यानंतर नामदार पदापर्यंत सर्वसामान्यांचे अण्णा कधी झाले हे कळलेच नाही, सरपंचपदापासून आमदार ते जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरापर्यंतचा अण्णांचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.
- केतन चव्हाण,
उपाध्यक्ष- खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पश्चिम विभाग
खेड तालुका संतांची आणि क्रांतिकारकांची भूमी आहे, याच भूमीत शेलपिंपळगांवच्या भोसे या गावात २९ मे १९५९ रोजी जन्म घेऊन अवघ्या खेड तालुक्याला विकासाच्या पटलावर नेले. एका शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या अण्णांना कुठलाही राजकीय वसा वा वारसा नसताना स्वकर्तृत्वावर त्यांनी आपले राजकीय व सामाजिक अस्तित्व निर्माण केले, अशा अण्णांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले. या आपल्या लाडक्या नेतृत्वाचा खेड तालुक्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. अशा या कार्यकुशल नेतृत्वाला खेड तालुक्यातील आम जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील शेलपिंपळगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, विधानसभा सदस्य, राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष अशी भरीव कारकीर्द. राजकीय जीवनाच्या प्रारंभापासून संघर्षच सहन करत सरपंच होताना गावकीचा, जिल्हा परिषद निवडणूक तर भावकीतील विरोधात, राजकीय विरोधकांशी अखंडपणे करत यशस्वी झाले.
खेड तालुक्यातील आदिवासी बांधव व पश्चिम पट्यातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी डेहणे गावात महाविद्यालय उभारले. आज डेहणे येथे शेकडो मुले, मुली शिक्षण घेत आहेत. तालुक्यात कायद्याच्या शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती, अण्णांनी राजगुरुनगरमध्ये लॉ कॉलेज सुरू केल्याने आज शेकडो विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेऊन वकिलीच्या क्षेत्रात ठसा उमटवताहेत. भीमाशंकर ते आळंदी अशा पवित्र गावांची सीमा लाभलेलाखेड तालुका विकासात अव्वल राहावा म्हणून अण्णा नेहमीच आग्रही राहिले. भीमाशंकर देवस्थान खेडमध्ये असून, खेड मध्येच राहावे अशी आग्रही भूमिकाही अण्णांचीच!
खेडमध्ये प्रभावी योजना कार्यान्वित
खेड तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागाचा विकास साधण्याचे कौशल्य त्यांनी साधले, तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. शेतीच्या पाण्यासाठी विजेच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या योजना तालुक्यात प्रभावीपणे कार्यान्वित केल्या. तालुक्याच्या विकासात क्रीडासंकुल, चांडोली ग्रामीण रुग्णालय, साकवपूल, सभामंडप, आयटीआय, लॅा कॅालेज, एसईझेड प्रकल्प असे वैविध्यपूर्ण कार्य अण्णांनी तालुक्यात आणले.
वाळद येथे भव्य पुलाची निर्मिती
अण्णांनी तालुक्याचा गतिमान विकास साधण्यासाठी तालुक्याच्या पूर्व भागातीलच नव्हे तर पश्चिम पट्यातील गावांनासुद्दा पक्या रस्त्यांनी जोडले. तालुक्याच्या वाड्या वस्त्यांपर्यंत पक्के रस्ते पोहचवण्याचे काम केले. चास कमान जलाशयामुळे पश्चिम पट्यातील अनेक गावांचा वाडा गावाशी व तालुक्याशी तुटलेला संपर्क जोडण्यासाठी वाळद येथे भीमा नदी पात्रात भव्य पुलाची निर्मिती करून भामनेर व भिमनेर खोरे एकत्र आणले.
अण्णांना सर्वांचे स्फूर्तिस्थान
पाईटमार्गे मुंबईचा रस्ता प्रगतीपथावर असून लवकरच खेडच्या पश्चिम पट्यातून मुंबईला काही तासात पोहोचवणे शक्य होणार आहे, हा पश्चिम पट्ट्याचा गतिमान विकास निश्चित असून हे सर्व एक द्रष्टा नेताच करू शकत होता व त्यांच्या माध्यमातून तो रस्ता पूर्ण होणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सह बँकेचे संचालक झाल्यापासून खेड तालुक्यातील बँकेच्या सुसज्ज इमारती झाल्या. उत्तम व्यवस्थापन अतिशय धीर गंभीर, शांत, प्रसंगी त्वेषाने आपली भूमिका मांडणारा व सतत समाजकार्यात मग्न, जनतेच्या गराड्यात दिसणारा हा नेता कधी थकलेला कोणी पाहिलाच नाही. आजही सकाळी पाच ते रात्री
बारा वाजेपर्यंत भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करून त्याच्या समस्येचे निराकरण करणारा हा नेता इतर नेत्यांपेक्षा वेगळाच असल्याने सर्वच पिढीतील प्रत्येकजण आण्णांना आपले स्फूर्तिस्थान मानतात.
भगीरथ प्रयत्नातून कोट्यवधींची विकासगंगा
अण्णा काल आमदार होते आज नाहीत पण एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेत अण्णा पुन्हा या खेड तालुक्याच्या आसणावर विराजमान होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जनहितासाठी जगणार एक सुवर्णपान माजी आमदार दिलीप मोहिते पाटील भगीरथ प्रयत्नातून कोट्यवधींची विकासगंगा खेड तालुक्याने पाहिली. आम जनतेने या नेत्याला झुकून वंदना दिली, झंझावती या विकास व्यक्तिमत्वाला गगनभेदी भरारीसाठी शुभेच्छांचे पंख देऊया, सारे मिळूनी .. या वाढदिवसाच्या शुभदिनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.