पुणे

दुग्धव्यवसाय जोडधंदा न राहता पूरक व्यवसाय

CD

चास, ता. २६ : शेतकऱ्यांनी तन्त्रशुद्धपणे गायींचे संगोपन करणे गरजेचे आहे. दुग्धव्यवसाय जोडधंदा न राहता परस्पर पूरक व्यवसाय झाला असल्याचे प्रतिपादन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी कमान-बारापाटी (ता. खेड) येथील मार्गदर्शन शिबिरात केले.
कमान-बारापाटी येथे ब्रिटानिया संचलित आशीर्वाद दूध संकलन केंद्र, हिंदुस्तान फीड्स व सर नेस वाडिया फाउंडेशन यांच्यावतीने पशू संगोपन व दुग्ध व्यवसाय’ याबाबत मार्गदर्शन झाले. यात हिंदुस्तान फीड्सचे एक्स्टेंशन आणि टेक्निकल सर्व्हिस मॅनेजर डॉ. अशोक झरेकर यांनी मार्गदर्शन करताना दुधाळ गाईंचे आहार व्यवस्थापन, गाभण काळातील संगोपन, जातिवंत कालवडींचे संगोपन, पशुखाद्य, गाई गाभण न राहण्याच्या समस्या, जनावरांमधील आनुवंशिकता, गोठा व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
ब्रिटानिया डेअरी इंडस्ट्रीजचे डॉ. राकेश कुमार, डॉ. जयदीप राठोड, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे पशुसंवर्धन अधिकारी धनेश पडवळ, पशुधन पर्यवेक्षक डॉ. मंगेश कुंभार, पशुधन विकास अधिकारी डॉ. पूजा बोंबले यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन हिंदुस्तान फीड्सचे मच्छिंद्र महाजन, अक्षय ढवळे, सर नेस वाडिया फाउंडेशनचे प्रणव जगताप, हिंदुस्तान फीड्सचे सुरेश काळे, ब्रिटानिया डेअरीचे अध्यक्ष मारुती नाईकरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT