पुणे

सोनपावलांनी गौराई आली घरा...

CD

चास, ता. ३१ : मंगल ध्वनीचा सूर..., मंद धुपाचा सुगंध..., अंबेचा जय जयकार. फुलांच्या पाकळ्यांची उधळण..., शंखनाद...,अखंड दीप..., रांगोळीसह फुलांच्या पायघड्या... तर अशा मंगलमय भक्ती सौहार्दाच्या वातावरणात गौराईचे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात चास (ता. खेड) व परिसरात थाटात आवाहन करीत पारंपरिक पद्धतीने घरोघरी आवाहन करण्यात आले. गौराई कशाच्या पावलांनी आली... सुख-समृद्धी, वैभवसंपन्न, मांगल्याच्या, सोनपावलांनी आली, पुत्र-पौत्रांच्या पावली आली.... असे म्हणत गौराईचे रविवारी (ता. ३१) सकाळपासून सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंतच्या मुहूर्तावर घरोघरी गौरईचे आवाहन करण्यात आले.
गौरीच्या तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामुळे सर्वत्र घरोघरी सकाळपासूनच चैतन्याचे वातावरण होते. परंपरेनुसार रांगोळीने हळदी कुंकवाने पावले काढण्यात आली. अंबा मातेचा जय जयकार करीत गौराईचे मुखवटे मंगल ध्वनीच्या सुरात घरात आणण्यात आले. घरात आणतांना गौराईचे औक्षण करण्यात आले. चास व परिसरात गणपती पाठोपाठ गौराइचेही आगमन उत्साहात, आनंदात व भक्तिपूर्ण वातावरणात झाले, रविवारी अनेक ठिकाणी गौराई स्थापना होऊन मनोभावे पूजा करण्यात आली, पावसानेही विश्रांती घेतल्याने गौराईच्या आगमनास विशेष उत्साह जाणवत होता.
गणपतीच्या स्थापनेनंतर उत्सुकता असते ती गौराईची. प्रामुख्याने महिला या गौराईची आरास करण्यात पुढाकार तर घेतातच पण पूजेचा मानही त्यांचाच असतो. चास व परिसरात अनेकांच्या घरी रविवारी या देवीची स्थापना करण्यात आली असून मुख्य पूजा सोमवारी (ता. १) पार पडणार आहे. मंगळवारी (ता. २) भावपूर्ण वातावरणात गौराईचे विसर्जन केले जाते. स्थापनेच्या दिवशी प्रामुख्याने महिला नदी तीरावर जाऊन पात्रातील वाळूचे खडे घेऊन घरी येतात व घराच्या प्रवेशद्वारावर या खड्यांसह गौराईंची पूजा करून ताटावर पळी वाजवत, वाजत गाजत गौराईला घरात आणतात व मनोभावे पूजा करण्यात आली. आज या गौराईच्या स्थापनेच्या दिवशी गावामध्ये या सणाचा उत्साह मोठ्या स्वरूपात पहावयास मिळाला. विशेष करून महिला वर्गामध्ये याचा उत्साह मोठा होता. चास येथे जयश्री जंगम, चैताली जंगम, पुनम कपाळे, कल्याणी कपाळे, चैत्राली घेवडे यांसह अनेक महिलांनी स्वतःसह सहकारी महिलांच्या घरी जाऊन गौराईची स्थापना केली.

ग्रामीण भागात दोन रूपे
ग्रामीण भागात आजही या गौराईची दोन रूपे पहावयास मिळतात त्यात एक म्हणजे मोठ्या तांब्यावर भांडे ठेवून त्याला साडी नेसवून भांड्याला डोळे व तत्सम चेहऱ्याचा आभास देत अलंकाराने सजवली जाते तर दुसरे रूप म्हणजे मुखवट्याचे असून काही ठिकाणी एक मुखवटा तर काही ठिकाणी दोन मुखवट्याच्या उभ्या किंवा बैठ्या स्वरूपातील गौराईची मनोभावे स्थापना केली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST: कर्करोग रुग्णांना दिलासा! केमोथेरपीपासून ते औषधांपर्यंत…; जीएसटी कपातीमुळे किती किती खर्च येणार? वाचा संपूर्ण हिशोब

Maratha Reservation: ‘सातारा गॅझेट’च्या नोंदीसाठी प्रयत्न करणार; मराठा समाज बांधवांचा निर्धार, मनोज जरांगे-पाटील यांचेच खरे श्रेय

Sin Goods In GST: जीएसटी कमी झाला, पण या 'सिन गुड्स' कोणत्या आहेत? ज्या खरेदी करणे होणार महाग

भीमा नदीच्या पट्ट्यात पुन्हा रक्तपात! ग्रामपंचायत अध्यक्षांची गोळ्या घालून निर्घृण हत्या; राजिउल्लाह, वसीम, फिरोजसह मौलाली अटक

Pitru Paksha 2025: पितृपक्ष सुरू होताच, चुकूनही करू नका 'हे' 6 काम, पितृदोषापासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT