पुणे

कृषी विभागाचे सामूहिक कीड व्यवस्थापनाचे आवाहन

CD

चास, ता. ९ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाताच्या पिकावर काही भागात पाने गुंढाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यावर तातडीने पिकावर औषधांची फवारणी करावी. तसेच शेतकऱ्यांनी सामूहिकपणे एकत्र येत कीड व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. याबाबत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होण्यासाठी मोळाव्याचे आयोजन केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वैभव विष्वे यांनी दिली आहे.

गेली काही दिवसांपासून वातावरणात होणारे बदल, रिमझीम पाऊस त्यामुळे भात पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. बुरशीजन्य रोग, कीड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होतो आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्यातील भोरगिरी, शिरगांव, मंदोशी तसेच डेहणेच्या काही भागात भाताच्या पिकावर पाने गुंढाळणाऱ्या अळीसह सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून पाने पांढऱ्या पापुद्र्यासारखी दिसत आहेत. फुटव्यांच्या सभोवताली वरील पाने कापून नळीच्या आकाराचे छोटे छोटे तुकडे दिसून येत आहेत, पानांचा रंग पांढऱ्या कागदासारखा झालेला असून, अळ्या गुंढाललेल्या पानाच्या सुरळ्या दिसून येत आहेत. या रोगग्रस्त पिकाची पाहणी कृषी विभागाच्या वतीने केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वैभव विष्वे यांनी दिली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून नारायणगाव येथील कृषी शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत तातडीने शेतावर भेट तसेच मार्गदर्शक मेळावा घेण्यात येणार असून त्यामध्ये शेतकऱ्यांना या विषयी माहिती देण्यात येईल.

प्रतिएकरी दहा पक्षी थांबे उभे करा
प्रादूर्भाव झालेल्या पिकावर व्यवस्थापनासाठी हायड्रोक्लोराईड ४ टक्के दाणेदार १८८ ग्रॅम किंवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार २०८ ग्रॅम प्रती गुंठा या प्रमाणात दाणेदार कीटकनाशक जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे, तसेच शेतात प्रतिएकरी दहा पक्षी थांबे उभे करावे, असे कृषी शस्त्रांनी सांगितले.

03812

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT