पुणे

खेडच्या नंदनवनाला लागले खड्ड्यांचे ग्रहण

CD

चास, ता. ९ : खेड तालुक्यातील पर्यटनासाठी नंदनवन असलेल्या पश्‍चिम पट्ट्यातील सगळ्यात जास्त वर्दळीचा असलेल्या वाडा-भोरगिरी रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून, पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे, या खड्ड्यांमध्ये वाहणे आदळणे, घसरून पडणे असे प्रकार घडलेले असून पर्यटकांची संख्या रोडावली आहे, हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतर केल्याने दुरुस्ती कधी होणार याची प्रतीक्षा आहे.
खेड तालुक्यातील सगळ्यात जास्त वाहतूक असणारा हा मार्ग असून पुढे हा मार्ग श्री क्षेत्र भीमाशंकर तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात आवडत्या तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात मार्गस्थ होत असल्याने साहजिकच छोट्यामोठ्या वाहनांसह आलिशान मोटर या रस्त्यावरून रोज मार्गस्थ होतात. सद्यःस्थितीत खेडच्या पश्‍चिम पट्ट्यात पाऊस होत असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पावसामुळे वाडा-भोरगिरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत, खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने खड्याचा अंदाज येत नसून, गाड्या आदळताहेत, घसरून पडताहेत. खड्ड्यांमुळे येणारे पर्यटक व भाविक नाराज होत असून पर्यायी मार्गांचा अवलंब करताना दिसून येत आहेत. पर्यटनामुळे खेडच्या पश्‍चिम पट्ट्यातील आदिवासी नागरिकांसह स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला असून हॅाटेल, पानटपऱ्या, वडापावसह चहाची दुकाने तसेच रानमेवा, रानभाज्या, वनौषधी यांच्या माध्यमातून त्यांचे अर्थार्जन होत आहे. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी आपला मार्ग बदलला असून, या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा मार्ग हा राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतर केला असल्याने खड्डे भरणार तरी कधी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT