पुणे

टोकावडे येथे रानडुकराचा महिलेवर हल्ला

CD

चास, ता. ५ : टोकावडे (ता. खेड) येथे लीलाबाई नामदेव आसवले या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाल्या आहे, घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वतीने तातडीने महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
लीलाबाई नामदेव आसवले या आपली पाळीव जनावरे घेऊन गुरुवारी (ता. ४) टोकावडे येथील सुळेच्या रानात चारत असताना सायंकाळी ४.४५च्या सुमारास रानडुकराने समोरून पळत येऊन लीलाबाई यांच्यावर जोरदार हल्ला केला. हल्ला एवढा जबरदस्त होता की लीलाबाई यांच्या गुडघ्याच्या खाली रानडुकराचा दात शिरल्याने मोठी जखम झाली आहे. तर हल्यामुळे त्या फेकल्या गेल्याने डोक्यालाही मार लागला आहे. यावेळी तेथे असणारे आदेश आसवले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या मदतीसाठी नागरिकांना बोलावले. घटनेची माहिती मिळताच खेडचे वन परिक्षेत्र अधिकारी वाय. यू. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टोकावडेचे वन परिमंडळ अधिकारी दत्तात्रेय फापाळे, वनरक्षक के. एस. पवार, वनरक्षक एस. वाय. अंबेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. जुन्नरचे साहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या वतीने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्याच्या घटना त्यातच आता रानडुकराच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या घटनांवर वनविभाने नियंत्रण आणावे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करावी, अशी मागणी एस. एम. सुपे मेमोरियल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॅा. संतोष सुपे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

Latest Marathi News Live Update : शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ

Rahgiri Anand Utsav : उज्जैनमध्ये राहगिरी आनंद उत्सव; शेतकऱ्यांना समर्पित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग

Eknath Shinde : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा झंझावात, साताऱ्यातून प्रचाराचा शुभारंभ

SL vs ENG, ODI: जो रूटचा रेकॉर्डब्रेक फॉर्म! शतक ठोकत विराट-सचिन पंक्तीत स्थान; हॅरी ब्रुकच्या वादळासमोरही श्रीलंकन गोलंदाज हतबल

SCROLL FOR NEXT