पुणे

‘भारतीय शेतीच्या विकासात महिलांचे योगदान’

CD

चास, ता.२४ : ‘‘भारतीय शेतीच्या विकासात महिला शेतकऱ्यांचे योगदान मोलाचे व अपरिहार्य असून त्यांच्या कार्याची दखल घेतलीचा पाहिजे,’’ असे स्पष्ट मत बायफ संस्थेचे प्रकल्प अधिकारी अभिजित कारळे यांनी कडधे (ता. खेड) येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

राष्ट्रीय किसानदिनानिमित्त कडधे येथे महिंद्रा अँड महिंद्रा प्रायोजित कृषी मित्र प्रकल्प राजगुरुनगर अंतर्गत बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने महिला शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याकरता विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारळे होते. प्रमुख उपस्थितांत परिसराच्या गावांमधील महिला वर्ग व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कारळे यांनी प्रेरणा कृषिमित्र प्रकल्पांतर्गत महिंद्रा अँड महिंद्रा व बायफ यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब, कृषी मूल्य साखळीस जोडणी, बाजारपेठ उपलब्धता, उत्पन्नवाढ आणि उद्यमशिलता विकास यांच्या समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी दरकवाडी येथील मुक्ताई महिला बचत गटाच्या जयश्री काळे यांनी आपल्या अनुभवाचे कथन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, बायफ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षात गावात व परिसरात झालेल्या सामाजिक व आर्थिक बदलांची माहिती दिली. तसेच कृषी मूल्यवर्धन, पोषणविषयक उपक्रम, शाश्वत शेती व तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठ जोडणी व महिलांच्या विकासावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

04175

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : गरवारे परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल, फिरकी घेत म्हणायला लावलं मराठी गाणं, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

SCROLL FOR NEXT