पुणे

खेड तालुक्यात ठाकरेंची शिवसेना भक्कम

CD

चास, ता. ४ : खेड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती भक्कम आहे. आमचे उमेदवार निश्‍चित झाले असून जिल्हा परिषदेचे सात ते आठ व पंचायत समितीचे १५ सदस्य निवडून येतील; मात्र समोरच्या पक्षाकडे उमेदवारच नसल्याने त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. २०२९ चे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून कोणाच्याही युत्या कोणाशीही होत असून ज्याचे एकमेकाशी जमत नव्हते ते एकत्र आलेत, मात्र कोणीही कोणाशी युती केली तरी आम्ही त्यांना पुरून उरणार आहे, अशी उपरोधिक टीका आमदार बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे व नेत्यांचे नाव न घेता केली.
खेड तालुक्यातील कडूस-चास गटातील सुमारे २८ कोटी ६६ लाख सोळा हजार रुपयांच्या कामांचे भूमिपूजन रविवारी (ता. ४) आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सौंरंग्या देवस्थानात तनुजा घनवट यांच्या प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला. या वेळी शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, युवा सेनेचे श्रीकांत सोनवणे, उपतालुका प्रमुख संजय घनवट, किरण गवारी, महिला आघाडीच्या नेत्या विजया शिंदे, हेमलता घनवट, रेश्मा भोसले, कविता गिलबिले, आशा कावडे, रेखा गारगोटे, उद्योजक संदीप घनवट, मृण्मय काळे, मृगेश काळे, अनिल टोके, विठ्ठल मुळूक, वैभव राक्षे, विशाल शिंदे, दत्ता रूके, संपत बालघरे, चंद्रकांत बारणे, अंकुश निमसे, पंचायत समीतीच्या इच्छुक उमेदवार राजश्री शिंदे, ऊर्मिला रूके, कविता राक्षे यांसह शिवसेना पदाधिकारी, तमाम शिवसैनिक यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच त्यामध्ये माधुरी शिंदे, विनायक मुळूक, राजू शिंदे, सविता पोखरकर, निलम मुळूक, बी. डी कोबल उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिंदे यांनी तर खरेदी-विक्री संघाचे संचालक अनिल टोके यांनी आभार मानले.

तनुजा, संजय घनवट यांच्याकडून विकासकामांचा डोंगर
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, जिल्हा परिषदेच्या सदस्या तनुजा घनवट व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांनी या गटात विकासकामांचा डोंगर उभा केला असून उर्वरित राहिलेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आल्याने त्यांच्या कामाचा झपाटा हा त्यांना कमीत कमी ८ ते १० हजारांच्या मताधिक्याने पुन्हा विजयी करणार आहे. शिवसेनेला जे सोडून गेले ते कायम पराभूत झालेले आहेत, असेही आमदार बाबाजी काळे म्हणाले.


4205

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता IPL 2026 स्पर्धेवरही? १९ वा हंगाम पुढे ढकलला जाणार? अध्यक्षांनी दिले अपडेट्स

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

SCROLL FOR NEXT