पुणे

घनवटवाडीतील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पिकाची गोडी

CD

चास, ता. १० : घनवटवाडी (ता. खेड) येथील शेतकरी दत्तात्रेय वसंत घनवट व रंजना दत्तात्रेय घनवट यांसह बाळासाहेब घनवट, तुषार विठ्ठल तळेकर यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत स्ट्रॅाबेरीची लागवड केली. चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना सध्या स्ट्रॅाबेरी पिकाची गोडी लागली आहे. दत्तात्रेय घनवट यांनी केवळ वीस गुंठ्यांत तीन महिन्यांत दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. पुढील दोन महिन्यांचे उत्पन्न व बाजारभाव पाहता तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळण्याचा विश्‍वास आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळताना दिसत आहे. अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो आहे. जी स्थिती कांदा व बटाटा पिकाची तीच स्थिती धना, मेथी, कोबी, फ्लावर पिकाची. त्यामुळे चास जवळील घनवटवाडी येथील शेतकरी दत्तात्रेय घनवट, रंजना घनवट यांसह बाळासाहेब घनवट यांनी सप्टेंबर महिन्यातत स्ट्रॅाबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जमिनीची मशागत करून शेणखत टाकून बेड तयार केले. त्यावर ठिबक सिंचनाची व्यवस्था केली, मल्चिंग पेपरच्या साह्याने बेडवर आच्छादन केल्यावर महाबळेश्र्वर वाई येथून विंटर व पार्थिनो या वाणाच्या रोपांची लागवड केली. दरम्यान, वीस दिवसांतच रोपांना फुले आली. लागवडीनंतर महिनाभराने फळधारणा झाली व येथून पुढे स्ट्रॅाबेरी पिकापासून उत्पन्न सुरू झाले. थंड वातावरण व पिकाला पोषक वातावरणामुळे ४५ दिवसांनी उत्पादन होती आले.
सर्वात पहिल्या तोड्याला चार ते पाच किलो फळे मिळाली. मात्र ती वाढत जाऊन आज याच वीस गुंठे क्षेत्रातून दिवसाआड नव्वद ते शंभर किलो स्ट्रॅाबेरीच्या फळांचे उत्पादन मिळत आहे. फळाच्या विक्रीसाठी मॅालला विकल्यावर सरासरी ३०० ते ४५० रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला. मात्र सद्य स्थितीत स्ट्रॅाबेरीची बाजारात आवक वाढल्याने २५० ते ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतो आहे., दत्तात्रेय घनवट यांनी सांगितले.

अजून दोन महिने स्ट्रॉबेरीपासून चांगले उत्पन्न मिळणार आहे. खर्च वजा जाता आम्हाला तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे. या शिवाय या स्ट्रॅाबेरी पिकात आंतरपीक म्हणून आम्ही लसूण लावला आहे. त्यापासून मिळणारे उत्पन्न आमचा अधिकचा नफा असणार आहे.
- रंजना घनवट, स्ट्रॉबेरी उत्पादक

04220

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT