पुणे

चोरट्यांनी रोहित्र फोडल्याने येळवली येथे वीजपुरवठा खंडीत

CD

चास, ता. १३ ः खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ पट्यातील डोंगरावर वसलेल्या येळवली (ता. खेड) गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा व इतर साहित्य चोरून नेले. त्यामुळे संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडीत झाला असून ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
येळवली हे गाव भीमाशंकरच्या कुशीत व डोंगरावर वसलेले आहे. गाव अभयारण्य लगत असल्याने बिबट्या व तत्सम प्राण्यांचा या गावामध्ये नेहमीच वावर असल्याने विजेची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. गावामध्ये शेतीचे साधन उपलब्ध नसल्याने बहुतांश कुटुंबे मजुरी व इतर उत्पन्नाच्या स्रोतांवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे घरगुती कामकाज, पाणीपुरवठा व दैनंदिन उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच सध्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळ सुरू असल्याने रात्रीच्या वेळी अभ्यास करणे अत्यंत कठीण झाले आहे. रात्रीच्या अंधारामुळे महिलांमध्ये, लहान मुलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वीज नसल्यामुळे रस्ते व घरांच्या परिसरात अंधार पसरल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ सुभाष डोळस, गौतम डोळस, लहू मेठल, यमन डोळस, विजय बाणेरे आणि अशोक बाणेरे यांनी तातडीने प्रशासनाकडे तक्रार नोंदवली. चोरी झालेल्या रोहित्राची दुरुस्ती करण्या ऐवजी तात्काळ नवीन रोहित्र बसवून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर; 'या' तारखेला मतदान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Stock market Today : शेअर बाजार लाल रंगात बंद! बाजारात 2.6 लाख कोटींचे नुकसान; Reliance चे शेअर कोसळले; कोणते शेअर्स तोट्यात?

मास्टर ब्लास्टर आणि बिग बींमध्ये रंगला सामना, फिंगर क्रिकेटमध्ये कोणी मारली बाजी? Viral Video

Sadashiv Patil: भाजपला शिंदे गटाचा ‘दे धक्का’! अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पाटील यांची निवड

Latest Marathi News Live Update: बिनविरोध निवड झालेल्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT