पुणे

वाडा येथे सदगुरू गोविंदबाबा पुण्यतिथी कार्यक्रमाची सांगता

CD

चास, ता. १९ : वाडा (ता. खेड) येथे स्वानंद सुखनिवासी ब्रम्हलिन वै. सदगुरू गोविंदबाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता किशोर महाराज बांगर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
वाडा येथील वै. सदगुरू गोविंदबाबा मंदिरात सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह गुरुवारी (ता. १५) रोजी सुरू होऊन सोमवारी (ता. १९) रोजी सांगता झाली. यामध्ये काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण, नेमाचे भजन, हरिपाठ, हरिकीर्तन व जागर हे भक्तिमय कार्यक्रम पार पडले. किशोर महाराज बांगर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहची सांगता झाली. सतत पाच दिवस चाललेल्या या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनरूपी सेवा पार पडली. यामध्ये बाळासाहेब महाराज शिंदे, किसन महाराज धंद्रे, सागर महाराज शिर्के, बाळशिराम महाराज मिंडे यांची किर्तनरूपी सेवा झाली तर सदगुरू गोविंदबाबा पुण्यतिथीनिमित्त भास्कर महाराज जगदाळे यांची कीर्तन सेवा पार पडली.
सप्ताहाच्या काळात मृदंगाचार्य अमोल कदम, संस्कार शिंदे, गायक भाऊ पावडे, पंढरीनाथ पावडे, प्रशांत पऱ्हाड, अमित कौदरे, प्रकाश पावडे, ज्ञानेश्वर पावडे, शंकर पावडे विणेकरी शांताराम मोरे,शांताराम गाढवे, हार्मोनिअम माऊली सुरकुले, सखाराम लांडगे, नथू लांडगे यांनी साथ संगत केली. काल्याच्या कीर्तनासाठी जिल्हा दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे, सरपंच रूपाली मोरे, उपसरपंच रोहीदास शेटे, माजी सभापती काळुराम सुपे, समीर सुपे, शिवाजी मोरे, भगवान लांडगे, रघुनाथ लांडगे, किरण हुंडारे, गजानन हुंडारे, गणेश देशमुख, मनिषा हिले, डॉ. शीतल हुंडारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जय जय धनुर्धर गोविंद सदगुरू सेवा मंडळ, वाडा, शेटेवाडी, कदमवाडी, वाडेदरा, दरकवाडी, बोऱ्हाडेवाडी, पावडेवाडी, पिंगटवाडी, साकुर्डी, थोरातवस्ती, वाडेकरवाडी, लांडगेवाडी, सतुर्केवस्ती, स्वामीनगर, माळीनगर, सुपेवाडी, समस्त ग्रामस्थ, मुंबईकर, पुणेकर यांनी केले होते. किरण हुंडारे, उत्तम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. गजानन हुंडारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT