पुणे

बटाटा पिकातून १०० दिवसांत दीड लाखांचा नफा

CD

चास, ता. २३ ः जिद्द, मेहनत व निसर्गाच्या साथीबरोबरच बाजारभावाने साथ दिल्यास शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतात हे नक्की आहे असाच अनुभव कमान (ता. खेड) येथील शेतकरी माजी सरपंच वर्षा नाईकरे, सुरेश नाईकरे व प्रकाश नाईकरे यांना आला आहे. एक एकर क्षेत्रावर लावलेल्या बटाटा पिकाने या शेतकऱ्यांना १०० दिवसांत खर्च जाऊन तब्बल एक लाख ४० ते पंचेचाळीस ४५ हजार रुपयांचा नफा मिळाला आहे.
येथील नाईकरे परिवाराने एक एकर क्षेत्रावर तीन महिन्यांपूर्वी यांत्रिक पद्धतीने मशागत करून शेणखत पांगवून बटाटा पिकाची लागवड केली. वेळेवर खतांची मात्रा, तसेच मर्यादित स्वरूपात औषधांची फवारणी केल्याने पीक जोमदार आले. पीक परिपक्व झाल्यावर गुरुवारी (ता. २२) पिकाची काढणी करण्यात आली.
बाजारात काही दिवसांपासून बटाट्याला ८०० ते ९०० रुपये क्विंटल बाजारभाव असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र, पिकाची चांगली गुणवत्ता व पिकाचा आकार पाहता बाजारात नाईकरे यांच्या बटाट्याला १२०० ते १३०० रुपये क्विंटल बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

आम्ही साडेपाच क्विंटल बटाटा बियाणाची लागवड केली होती. स्वच्छ सूर्यप्रकाश, तसेच रात्रीच्या थंडीमुळे पिकाची वाढ जोमदार झाली व रोगाची मात्रा न झाल्याने औषधांचा खर्च वाचला. पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत जवळपास ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला, तर पिकापासून सुमारे १४० क्विंटल उत्पन्न मिळाले असून, १२०० ते १३०० रुपये क्विंटल बाजारभाव मिळाल्याने सरासरी एक लाख ८० ते ८५ हजार रुपये मिळाले आहेत.
- वर्षा नाईकरे, सुरेश नाईकरे, शेतकरी

04251

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पाची सूत्रे 'या' महिला अधिकाऱ्याच्या हाती! निर्मला सीतारमण यांच्या सोबत बजेट तयार करणारी टीम कोण? वाचा इनसाइड स्टोरी

Viral Video: ''रोज दारु पितोस.. दारु पिऊनच गाडी चालवली असणार'', जखमी बॉयफ्रेंडच्या आईसमोरच गर्लफ्रेंडचा पारा चढला

Fire News: भीषण आग! सुक्या अन्न गोदामात अग्नितांडव; ७ जणांचा मृत्यू, २० कामगार बेपत्ता, घटनेनं खळबळ

एक- दोन नाही तर तब्बल 200 वर्षांनी बनतोय त्रिग्रही राजयोग ! येत्या 6 दिवसांत तीन राशींना येणार सोन्याचे दिवस

Latest Marathi news Update : आयसीसी टी२० विश्वचषक ट्रॉफीची पहिली झलक

SCROLL FOR NEXT