चास, ता. २१ : चास (ता. खेड) येथील गुंजवठा वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाली. या घटनेमुळे तसेच बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.
गुंजवठा येथील संतोष रतन टोके यांच्या घरामागे असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात शुक्रवारी (ता. २०) बिबट्याने प्रवेश केला व गोठ्यातील एक वर्ष वयाच्या जर्शी कालवडीचा फडशा पाडला. सकाळी गोठ्यात आल्यावर संतोष टोके यांना ही घटना कळाली. या घटनेची माहिती त्यांनी त्वरित वनविभागास दिली. त्यामुळे संतोष भागडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
दरम्यान, घटनेबाबत भागडे यांनी सांगितले की, बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आलेला असून नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाला सहकार्य करावे.
04325
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.