पुणे

‘चासकमान’मधून रब्बीचे आवर्तन बंद

CD

चास, ता. ५ : खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान (ता. खेड) धरणातून रब्बी हंगामासाठी सोडलेले आवर्तन बुधवारी (ता. ४) बंद करण्यात केले. उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तनाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी एस. एस. शिंदे तसेच साहाय्यक अभियंता श्रेणी १ शुभम सुसुंद्रे यांनी दिली आहे.
धरणात सद्यःस्थितीत ५३.१३ टक्के म्हणजेच ४.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. चासकमान धरणातून रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन १४ डिसेंबरपासून सोडण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी धरणात ९७.१५ टक्के म्हणजेच ८.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सध्या खेड तालुक्यासह शिरूर तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांची गरज ओळखून चासकमान पाटबंधारे विभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशाने बुधवारी धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे.
धरणातून सोडलेले आवर्तन बंद झाल्याने तात्पुरता का होईना खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण धरणातून आवर्तन सोडताच पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्यावर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.


04362

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

Ali Khamenei: खामेनेई यांच्या हत्येनंतर भारताकडून शोक व्यक्त; इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेत स्वाक्षरी

Pune News : कमी दराच्या निविदांचा होणार बंदोबस्त; स्थायी समितीतील बैठकीमुळे ठेकेरादांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT