पुणे

चासच्या उपसरपंचपदी सविता रहाणे बिनविरोध

CD

चास, ता. १३ : चास (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सविता अनिल रहाणे यांची बिनविरोध निवड झाली.
सर्वांना पदाची संधी मिळावी, या उद्देशाने चासचे उपसरपंच सुनील वाळुंज यांची आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सविता रहाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी सरपंच विनायक मुळूक व ग्रामपंचायत अधिकारी प्राजक्ता डोके यांनी सविता रहाणे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी पूनम रासकर, राजेंद्र घाटकर, जावेद ईनामदार, संदिप ढमढेरे, आशा टोके, सविता टोके आदी सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्या हस्ते सविता रहाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अनिल टोके, नीलम मुळूक, अविनाश मुळूक, पोलिस पाटील वंदना रासकर, मीना जंगम, कमल घनवट, वैष्णवी चासकर, अनिल रहाणे, रामभाऊ नाईकरे, अतुल रोडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT