पुणे

कळमोडी धरणाचे पाणी आंबेगावला देण्यास विरोध

CD

चास, ता. २३ : खेड तालुक्यातील जनतेला पाणी नाही, मात्र खेड तालुक्यातील कळमोडी धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्याला देण्यास शासन मान्यता देते, हे चुकीचे आहे. शासन आमचा कोणताही विषय गांभीर्याने घेत नाही. चासकमान धरणात बुडीत बंधारे तातडीने घ्या, कळमोडी धरणाचे पाणी आंबेगावला देऊ नका, या मागणीसाठी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विविध गावांतील नागरिक बुधवारी (ता. २५) राजगुरुनगर येथे भव्य मोर्चा काढून शासनाला निवेदन देणार आहेत.
चासकमान धरणामधून कालव्याद्वारे आवर्तन सोडल्यावर खेडच्या पश्चिम पट्ट्यातील पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांमधील नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात येऊन दरवर्षी उन्हाळ्यात येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेली वीस वर्षांपासून येथील नागरिक धरणांतर्गत बुडीत बंधारे होण्यासाठी आग्रही आहेत, मात्र त्यांची ही मागणी पूर्णत्वास जात नाही. याबाबत पाणलोट क्षेत्रातील धुवोली, वांजाळे, शिरगाव, मंदोशी, मोरोशी, धामणगाव, डेहणे, एकलहरे, नायफड, शेंदूर्ली, खरोशी, आव्हाट, टोकावडे यांसह गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावातील नागरिक एकत्र आले असून, बुधवारी राजगुरुनगर येथे मोर्चा काढणार असल्याबाबतचे निवेदन शासनाला दिले.
बुधवारी सकाळी हुतात्मा राजगुरूंच्या पुतळ्याला, मार्केटयार्डामधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शांततामय मार्गाने मोर्चा जुना मोटर स्टँडमार्गे पंचायत समितीमध्ये सभापती, तहसील कचेरीमध्ये तहसीलदारांना व त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आपल्या समस्यांची माहिती देऊन मोर्चा समाप्त होणार आहे.
याबाबत सोमवारी (ता. २३) धुवोलीच्या उपसरपंच मोनिका जठार, सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी पोखरकर, सुजाता कोरडे व शुभांगी जठार यांनी खेड तहसील, गटविकास अधिकारी, खेड पोलिस ठाण्याला निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI New Rule: RBI चा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार! आता ही गोष्ट केल्याशिवाय पेमेंट होणार नाही...

IPL 2026 Marathi News: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला 'तो' यंदा RCB चा भाग नाही; फ्रँचायझी म्हणते, त्याच्यासोबतचा करार...

"म्हणून स्वप्नीलने मला 1000 रुपये दिले" ; अभिनेत्याने सांगितला खास किस्सा, म्हणाला..

Latest Marathi News Live Update : तृतीयपंथीयांसाठी 'बीज भांडवल योजना' जाहीर; स्वयंरोजगारासाठी मोठी संधी

Satara Jalav Ghat Accident : देवीच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला! जळव घाटात भाविकांची गाडी उलटली; एका महिलेचा जागीच मृत्यू, आठ ते दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT