पुणे

वाडा परिसरात पिके जमीनदोस्त

CD

चास, ता. ३१: वाडा, गुंडाळवाडी आणि बुरसेवाडी (ता.खेड) परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार गारपिटीमुळे रब्बी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
डापरिसरात सोमवारी (ता.३०) दुपारनंतर सुमारे एक तास चाललेल्या तुफान पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला, आंबा, पेरू, चिकू या फळबागांसह गहू व हरभरा ही पिके जमीनदोस्त झाली. गारांच्या मारामुळे झाडांची पाने गळून पडली पडली. जनावरांसाठी साठवलेला चाराही भिजला आहे. यामुळे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडल्याची भावना साईनाथ चंद्रावळे, कैलास आसवले, जालिंदर पोखरकर या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी केली आहे.


04459

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shabbir Ahmed: मोठा दहशतवादी कट उघड! ३ मंदिरांची पाहणी; व्हिडिओ शूट करून पाकिस्तानला पाठवले, शब्बीर लोनचे धक्कादायक खुलासे

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Electric Shock: शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना, उसाला पाणी देताना दुघर्टना, कुटुंबीयांचा आक्राेश!

Leopard Skin Smuggling : साताऱ्यापासून लातूरपर्यंत पसरलंय तस्करीचं जाळं; कोल्हापूर महामार्गावर बिबट्याची दोन कातडी जप्त, मोठी टोळी गजाआड

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

SCROLL FOR NEXT