चास, ता. २१ : टोकावडे (ता. खेड) केंद्रातील आदिवासी व दुर्गम भागातील तीन शाळांना सत्-करम फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून रविवारी (ता. १९) पोर्टेबल शौचालये प्रदान करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह गुणवत्तेत वाढ होईल, असा विश्वास फाउंडेशनचे दत्तात्रेय सावंत यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि सत्-करम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेवाडी, वरचे भोमाळे आणि येळवळी या शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. दुबई येथील शारदा भट आणि सुरेखा पोरे यांच्या सौजन्याने हा निधी उपलब्ध झाला. शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रप्रमुख ईश्वर वाघमारे यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प साकारला.
यावेळी फाउंडेशनचे संचालक अनुज नरोला, जिजाबा सोळसे, विस्तार अधिकारी अनिता शिंदे, सरपंच नाथाभाऊ तळपे, विकास रोकडे उपस्थित होते. दत्तात्रेय सावंत यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. प्रकाश बोरावडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सागर हगवणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.