पुणे

सर्पदंशाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा

CD

खोडद, ता. ६ : "सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मानसिक आधार द्या. त्याच्यावर त्वरित प्रथम उपचारांची गरज असते. सर्पदंश टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी," असे आवाहन सर्पदंश तज्ज्ञ डॉ.सदानंद राऊत यांनी केले.
हिवरेतर्फे नारायणगाव येथील ग्रामविकास मंडळ संचलित कुलस्वामी खंडेराय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्पदंश व घ्यावयाची काळजी याविषयी सर्पदंश तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
शेतमजूर, लहान मुले यांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्पदंशाच्या बाबतीत माहिती व्हावी, जनजागृती व्हावी व त्यातून सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण कमी व्हावे. या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सर्पदंशाबाबत माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी डॉ. राऊत यांनी सर्पदंश कसा टाळावा? विषारी साप कोणते? बिनविषारी साप कोणते? सर्पदंश झाल्यानंतर प्राथमिक स्वरूपात काय काळजी घ्यावी? दंश केलेला साप विषारी आहे की बिनविषारी? हे कसे ओळखावे? याविषयी आपल्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक तबाजी वागदरे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण शिंदे यांनी आभार मानले.

अशी घ्या काळजी
* जमिनीवर झोपू नका.कॉट किंवा बाजेवर झोपा.
* सर्पदंश झालेल्या रुग्णाला मोकळ्या हवेत घ्या.
* दंश झालेला भाग हृदयाच्या पातळीच्या खाली ठेवावा.
* सर्पदंशानंतर लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका.
* दंश झालेल्या ठिकाणी कापू नका.
* दंश झालेल्या ठिकाणी बांधू नका.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचवणे एवढेच ध्येय नाही तर सर्पदंश होऊच नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेळोवेळी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून सर्पदंश कसे टाळता येतील. याबाबत विद्यार्थी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.
- डॉ.सदानंद राऊत, सर्पदंश तज्ज्ञ, नारायणगाव

00377

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT