पुणे

‘शिक्षक भरतीपूर्वी जिल्हाअंतर्गत बदल्या करा’

CD

खोडद, ता. २१ : शिक्षक पदभरतीपूर्वी जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबवून दिव्यांग, गंभीर आजारी, पती-पत्नी एकत्रीकरण व अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी जुन्नर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेश दुरगुडे यांनी केली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार यापुढे जिल्हाअंतर्गत बदल्या होणार नाहीत. त्यामुळे शेवटची संधी म्हणून शिक्षक भरतीपूर्वी समुपदेशन पद्धतीने रिक्त जागेवर विनंती बदल्या करा, अशा सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिल्या होत्या. त्यानुसार अनेक जिल्हा परिषदांनी आचारसंहितेपूर्वी बदली प्रक्रिया राबवून शिक्षकांना न्याय दिला. परंतु, पुणे जिल्हा परिषदेमध्ये समुपदेशन प्रक्रिया न राबविल्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ग्रामविकास विभागाने १७ मे २०२४ रोजी सर्व जिल्हा परिषदांना बदली प्रकिया राबविण्याबाबत सूचित केले आहे. या आदेशानुसार बदल्या जलदगतीने राबवून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी जुन्नर तालुका शिक्षक समितीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT