पुणे

संक्रमणावस्थेच्या काळात मुलांशी मित्रासारखे वागावे

CD

खोडद, ता. १५ : ‘‘आपले पाल्य विकसित होत आहे, हे लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्यांना मैत्रीची वागणूक द्यायला हवी. पाल्यांच्या संक्रमणावस्थेतील काळात पालकांनी त्यांच्याशी हळूवारपणे, मैत्रीच्या नात्याने वागून व त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले पाहिजे. सर्वार्थाने परिपूर्ण असे उद्याचे जबाबदारी नागरिक म्हणून पाल्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे,’’ असे आवाहन डॉ. वंदना कुचिक यांनी केले.
महात्मा फुले विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पालक शिक्षक समिती यांच्यावतीने शुक्रवारी (ता. १३) खोडद (ता. जुन्नर) येथे विद्यार्थ्यांसाठी ‘शरीर साक्षरता’ व ‘गुड टच, बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर पार पडले. यामध्ये मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. कुचिक यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. ‘शाऊट, रन अँड टेल’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून वाईट प्रसंग उद्भवल्यास त्यावर कशी मात करायची हे डॉ. कूचिक यांनी गाण्यातून व प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना समजावले.
या शिबिरात ‘शरीर साक्षरता’ या लैंगिक आणि मानसिकदृष्ट्या संवेदनशील विषयावर मार्गदर्शन करताना पौगंडावस्थेतील मुले, मुली व त्यांच्या आई वडिलांना पडणारे प्रश्‍न, समस्या, तसेच शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व लैंगिक बदलांबाबत निर्माण होणारे वेगवेगळे संभ्रम, या बदलांना सामोरे जाताना निर्माण होणारे कुतूहल, जिज्ञासा, गोंधळलेपण, अनामिक भीती, समज- गैरसमज याबद्दलची शास्त्रोक्त माहिती डॉ. कुचिक यांनी पालकांना दिली. मासिक पाळी, गर्भधारणा, स्वच्छता, पौगंडावस्थेत स्वभावात होणारे बदल, पी.सी.डी.ओ. आजार, पॉक्सो कायदा, नैतिक मूल्ये, समाज माध्यमांचा प्रभाव, व्यसने, व्यक्तिमत्त्व विकास, आहार व व्यायामाचे महत्त्व तसेच स्वातंत्र्य आणि स्वैराचार, प्रेम आणि शारीरिक आकर्षण, सार्वजनिक ठिकाणी होणारे सर्हेतुक व निर्हेतुक स्पर्श, त्यावेळी घ्यावयाची दक्षता आदींबाबत वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांतून त्यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका निशा दळवी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता गायकवाड, पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष दत्ता वामन, सरपंच मनीषा गुळवे, माजी सरपंच जालिंदर डोंगरे, विश्‍वास घंगाळे, ज्येष्ठ नागरिक परशुराम कुचिक, संतोष काळे, श्रीधर गायकवाड, विक्रांत गायकवाड व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.जी. कांबळे यांनी केले. तेजल वायाळ यांनी आभार मानले.

‘‘मुली व मुलांनी पौगंडावस्थेत प्रवेश केल्यावर त्यांना शरीर व मनाच्या भावविश्‍वाची शास्त्रशुद्ध ओळख करून देण्यासाठी शरीर साक्षरतेचे शिक्षण दिले पाहिजे. वयात येणाऱ्या पाल्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी काय आहे, हे लक्षात घेऊन पाल्यांच्या स्वभावातील बदल पालकांनी स्वीकारायला हवेत. या विषयाचे गांभीर्य आणि आवश्यकता लक्षात घेता मुलांच्या मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्याची काळजी घेणे ही शिक्षकांसोबतच पालकांचीही सामूहिक जबाबदारी आहे.’’
- डॉ. अरुण कुचिक, फॅमिली फिजिशियन व सर्जन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT