पुणे

बोरी खुर्द येथे किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन

CD

खोडद, ता. १३ : महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्यावतीने बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथील गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेत किशोरवयीन मुली तसेच महिला यांच्यासाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते, अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक शमशुद्दीन पटेल यांनी दिली.

यावेळी बोरी खुर्द गावच्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली संभाजी काळे, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा बांगर, वनिता भोर व इतर महिला उपस्थित होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्रशालेतील सर्व मुली व महिला यांना आरोग्यसेविका उज्ज्वला गवळी यांनी लैंगिक, आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन केले. अल्पवयीन मुले व मुली यांमध्ये निर्माण होणारे परस्पर आकर्षण व धोके, सामाजिक समस्या यामुळे भविष्यात निर्माण होणारे प्रश्‍न याबद्दल सचित्र अशी सविस्तर माहिती गवळी यांनी दिली. जिल्हा परिषद पुणे यांनी तयार केलेली मार्गदर्शन पुस्तिका मुलींना यावेळी दिली.

या कार्यक्रमासाठी डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, समन्वयक योगेश वाकचौरे, अभिषेक चुरगुडे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक संजय धायबर, अमित शेटे, हर्षदा जाधव, सोनल जाधव, सेवक रवींद्र जाधव हे उपस्थित होते. मुख्याध्यापक पटेल यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक विजय चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT